कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

Ration Card धारकांसाठी मोठी बातमी! 1 एप्रिल पासून ‘या’ नागरिकांचे रेशन होणार बंद… परंतु महिलांसाठी ही खुशखबर

01:11 PM Mar 03, 2025 IST | Krushi Marathi
ration card

Government Decision:- राज्यातील रेशनकार्ड धारकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, आता गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अंत्योदय योजनेतील पात्र महिलांना साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. सोलापूर शहरातील ६,०७२ तसेच ग्रामीण भागातील ४९,१०३ महिलांना गुढीपाडव्याच्या दिवशी रेशन दुकानांमधून प्रत्येकी एक साडी मिळणार आहे. सरकारने या योजनेची घोषणा केली असली तरी अद्याप साड्या पोहोच झालेल्या नाहीत. मात्र, गुढीपाडव्याच्या दिवशी हे वाटप करण्यात येईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

Advertisement

1 एप्रिल पासून स्वस्त धान्य योजनेत मोठे बदल

Advertisement

दरम्यान, सरकारने स्वस्त धान्य योजनेत मोठे बदल करत १ एप्रिलपासून ई-केवायसी न केलेल्या रेशनकार्ड धारकांचे रेशनधान्य बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक लोक अधिक उत्पन्न असूनही रेशन दुकानांमधून स्वस्त धान्य घेत असल्याने आणि बनावट रेशनकार्डधारकांचे प्रमाण वाढल्याने सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे.

केंद्र सरकारच्या निर्देशानुसार रेशनकार्डवरील प्रत्येक व्यक्तीने ३१ मार्चपर्यंत ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही मुदतवाढ शेवटची असून, जर लाभार्थ्यांनी ठरलेल्या कालावधीत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर त्यांना स्वस्त दरात धान्य मिळणार नाही.

Advertisement

सोलापूर शहरात सुमारे ४.२५ लाख व्यक्तींनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली असली तरी, अजूनही १ लाख लोकांनी ही प्रक्रिया केलेली नाही. ग्रामीण भागातील परिस्थिती आणखीनच गंभीर असून, एकूण १८.३० लाख लाभार्थ्यांपैकी ५ लाख नागरिक अद्याप ई-केवायसीपासून वंचित आहेत.

Advertisement

विशेषतः पाच वर्षांखालील मुले आणि ७० वर्षांवरील वृद्धांची ई-केवायसी करताना तांत्रिक अडचणी येत आहेत. आधार कार्डशी संबंधित काही समस्या असल्याने पुरवठा विभागाचे अधिकारीही यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जर या समस्येवर वेळेत तोडगा निघाला नाही, तर या वयोगटातील व्यक्तींनाही स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे.

घरी बसून करता येईल ई केवायसी

ई-केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने ‘मेरा ई-केवायसी’ हे विशेष मोबाइल ॲप तयार केले आहे. लाभार्थी घरी बसूनच ॲपच्या माध्यमातून ई-केवायसी करू शकतात. याशिवाय, जवळच्या रेशन दुकानात जाऊनही ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. मात्र, सरकारने स्पष्ट केले आहे की, ३१ मार्चनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, त्यामुळे नागरिकांनी वेळेतच ही प्रक्रिया पूर्ण करावी.

रेशनकार्डसाठी ई-केवायसी सक्तीचे केल्यानंतर बनावट कार्डधारकांना गाळण्याचा सरकारचा हेतू आहे. मात्र, यामुळे अनेक पात्र लाभार्थीही अडचणीत येण्याची शक्यता आहे. आता नागरिकांनी ३१ मार्चपूर्वी ई-केवायसी करून आपले स्वस्त धान्य मिळण्याची हमी घ्यावी, अन्यथा १ एप्रिलपासून रेशनधान्य थांबवले जाईल.

Next Article