कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

रेल्वे प्रवाशांसाठी कामाची बातमी ! तिकीट असले तरी टीटी तुमच्याकडून दंड वसुल करणार, रेल्वेचा हा नियम तुम्हाला माहितीच असायला हवा

08:19 PM Dec 17, 2024 IST | Krushi Marathi
Railway News

Railway News : भारतात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे. देशात रेल्वेचे नेटवर्क हे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे शिवाय रेल्वेचा प्रवास हा सर्वसामान्यांना परवडतो यामुळे अनेक जण रेल्वेने प्रवास करतात. जर तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठीच आहे. खरंतर भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी नेहमीच प्रयत्नशील असते.

Advertisement

नवनवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यासोबतच भारतीय रेल्वेने आता तिकीट बुकिंग ची प्रोसेसही सोपी करून टाकलीये. तुम्ही आता घरबसल्या तुमचे तिकीट बुक करू शकता आणि नियोजित तारखेला प्रवासाचा आनंद घेऊ शकता. पण, रेल्वेने तिकीट बुकिंग संदर्भातील काही नियम देखील चेंज केले आहेत.

Advertisement

भारतीय रेल्वेच्या नव्या नियमानुसार आता तुम्हाला रेल्वेने प्रवास करायचा असेल तर फक्त तिकीट असून चालणार नाही तर तिकिटासोबतच तुमच्याकडे ओळखपत्र असणे देखील अनिवार्य आहे. जर तुम्ही खिडकीतून तिकीट बुक केले असेल तर कोणतीही अडचण नाही, परंतु जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक केले तर अशावेळी तुम्हाला ओळखपत्र लागणार आहे.

आजकाल बहुतेक लोक ऑनलाइन तिकीट बुक करतात. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे ई-तिकीट असेल, तर ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी तुमच्याकडे ओळखपत्र देखील असणे आवश्यक आहे. जर तुम्ही वैध ओळखपत्राशिवाय ट्रेनमध्ये प्रवास करत असाल, तर TT तुमच्याकडून दंड वसूल करू शकतो.

Advertisement

अन तुम्हाला ट्रेनमधून खाली सुद्धा उतरवू शकतो. भारतीय रेल्वेच्या कायद्यानुसार, जर तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक केले असेल आणि मूळ ओळखपत्र सोबत आणले नसेल, तर ते तिकीटविरहित मानले जाईल आणि त्यानुसार तुमच्यावर कारवाई केली जाईल.

Advertisement

अशा प्रवाशांकडून दंड वसूल केला जातो शिवाय त्यांना रेल्वेतून उतरवले जाऊ शकते. तुमच्याकडे कन्फर्म तिकीट असले तरी, ओळखपत्राशिवाय तुमचे तिकीट पूर्णपणे निरुपयोगी मानले जाईल.

जर तुम्ही ऑनलाईन तिकीट बुकिंग केलेली असेल आणि तुमच्याकडे ओळखपत्र नसेल तर, टीटी तुम्हाला विना तिकीट प्रवासी मानेल आणि तुम्ही ज्या वर्गात प्रवास करत आहात त्यानुसार तुमच्याकडून दंड आकारला जाईल.

सर्वप्रथम, TT तुमच्याकडून प्रवासाच्या तिकिटासाठी शुल्क आकारेल, जे तुमचे तिकीट कोठे केले आहे आणि तुम्हाला कुठे जायचे आहे यामधील अंतराचे पूर्ण भाडे असेल. याशिवाय एसी बोगीतून प्रवास करत असल्यास ४४० रुपये आणि स्लीपरमध्ये प्रवास करत असल्यास २२० रुपये दंडही आकारण्यात येणार आहे.

Tags :
Railway News
Next Article