कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

पुण्यातील शेतकऱ्याचा नादखुळा ! बीट लागवडीतून कमवलेत तब्बल 14 लाख, कस केलं नियोजन?

06:17 PM Dec 22, 2024 IST | Krushi Marathi
Pune Success Story

Pune Success Story : अलीकडे शेतीचा व्यवसाय हा मोठा आव्हानात्मक बनलायं. मात्र असे असले तरी शेतकरी बांधव आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून शेती मधून लाखोंची कमाई करत आहेत. फक्त पारंपारिक पिकांची शेती करण्याऐवजी आता भाजीपाला वर्गीय पिकांची देखील मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने चक्क बीट लागवडीतून लाखो रुपयांची कमाई करून दाखवली आहे.

Advertisement

बीटचा वापर सॅलड म्हणून होतो याशिवाय इतरही अनेक गोष्टींसाठी बीट वापरले जाते. बीट हे एक आयुर्वेदिक कंदमूळ आहे. त्यामध्ये असणारे औषधी गुणधर्म मानवी आरोग्यासाठी विशेष फायद्याचे आहेत आणि यामुळे बाजारांमध्ये याला मोठी मागणी असते.

Advertisement

एवढेच नाही तर हर्बल कलर्स बनवण्यासाठी देखील बीट उपयोगात आणले जाते. दरम्यान याच भेट लागवडीतून पुण्यातील एका शेतकऱ्याने लाखोंची कमाई करून दाखवली आहे. जिल्ह्यातील धामरी शिरूर या छोट्याशा गावातील चंद्रकांत डफळ या तरुण शेतकऱ्याने ही किमया साधली आहे.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीचा शोध न घेता या तरुणाने बीटरूट या कंद मुळाची लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्याने इतरही अन्य भाज्यांची लागवड केली आहे. या तरुणाने भाजीपाला पिकांच्या शेतीतून आपले पूर्ण नशीब बदलून टाकले आहे. चंद्रकांत डफळ यांनी सांगितले की, शिकत असताना बरीच वर्षे गेली.

Advertisement

त्यानंतर शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्याऐवजी शेतीचा छंद घेण्याचे त्यांनी ठरवले, ज्यामध्ये काही काळानंतर ते यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी शेती हाच व्यवसाय केला. वेगवेगळे प्रयोग करून सहा एकर शुगर बीटची लागवड करून 13 लाखांचा निव्वळ नफा कमावल्याचे डफळ यांनी सांगितले.

Advertisement

त्यांनी लालीमा जातीच्या साखर बीटची लागवड केली. कटिंग पद्धतीने त्यांनी आपल्या जमिनीत बीटची लागवड केली. त्यांनी त्यांच्या सहा एकर शेतात प्रत्येकी 200 ग्रॅमच्या साठ पुड्या लावल्यात.

पाणी, हवामान आणि उष्णता यांचा अभ्यास करून त्यांनी पिकांवर योग्य ती औषधे फवारली आणि सहा एकर जमिनीत त्यांना 70 टन इतके विक्रमी उत्पादन मिळाले. त्यांनी उत्पादित केलेल्या बीटला स्थानिक बाजारांमध्ये तर मोठी मागणी आहेच शिवाय इतरही मोठमोठ्या बाजारांमध्ये हे बीट चांगल्या भावात विकले गेले.

डफळ यांचे पीक नोव्हेंबर मध्ये तयार झाले आणि यावेळी त्यांना 24 रुपये प्रति किलो असा विक्रमी दर मिळाला. या पिकासाठी त्यांना चार लाख रुपयांचा खर्च आला आणि जवळपास 13 लाख रुपयांचा नफा त्यांना यातून मिळाला आहे.

त्यांनी सहा एकर जमिनीमध्ये याची लागवड केली होती आणि आता या पिकातून त्यांना चांगली कमाई झाली असल्याने पंचक्रोशीतील इतरही शेतकरी यांसारख्या विविध पिकांची लागवड वाढवणार असे दिसते. त्यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे.

Tags :
Pune Success Story
Next Article