पुणे, सोलापूरातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! हुतात्मा एक्सप्रेस ट्रेन संदर्भात रेल्वेने घेतला मोठा निर्णय, आता......
Pune Solapur Railway : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सोलापूर-पुणे रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक खास ठरणार आहे. कारण की, रेल्वे प्रशासनाने या मार्गावर सुरू असणाऱ्या हुतात्मा एक्सप्रेस ट्रेन संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय.
या निर्णयाचा सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांना फायदा होणार असून प्रवासी संघटनांच्या माध्यमातून रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार हुतात्मा एक्स्प्रेसमधून रिझर्व्हेशन न करता ऐनवेळी जनरल तिकीट काढून प्रवास करता येणार आहे.
एवढेच नाही तर या एक्सप्रेस ट्रेनच्या तीन आरक्षित डब्यात बदल करून त्याऐवजी तीन डबे जनरल केले जाणार आहेत. यातून सर्वसामान्य २३५ प्रवाशांना अनारक्षित (जनरल) तिकिटावर प्रवास करता येईल अशी माहिती संबंधितांच्या माध्यमातून समोर येत आहे.
रेल्वेने घेतलेला हा निर्णय अजून लागू झालेला नाही मात्र येत्या सात-आठ दिवसांनी हा निर्णय लागू होणार आहे. येत्या २१ नोव्हेंबरपासून सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेसला हा निर्णय लागू केला जाईल अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या निर्णयाचा सोलापूर मधील रेल्वे प्रवाशांना सर्वाधिक फायदा होईल असे बोलले जात आहे. खरं तर सोलापूर हुन पुण्याला जाणाऱ्यांची संख्या फारच अधिक आहे.
अशा परिस्थितीत या निर्णयाचा येथील रेल्वे प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. हुतात्मा एक्सप्रेस सोलापूरकरांची जीवनवाहिनी आहे. मात्र कोरोना काळापासून या गाडीला जनरल डब्बेचं नव्हते.
म्हणून लाईफ लाईन म्हणून समजल्या जाणाऱ्या हुतात्मा एक्स्प्रेसने प्रवास करताना सोलापूर मधील विद्यार्थी, व्यापारी, नोकरदार, शेतकरी यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो होता.
पण आता हुतात्मा सुपरफास्ट एक्स्प्रेसचे डी ९, डी १० आणि डीएल १ (एसएलआर) हे डबे जनरल डबे राहणार आहेत. येत्या 21 तारखेपासून हा नवा बदल लागू केला जाणार आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना तर फायदा होणारच आहे शिवाय रेल्वेच्या उत्पन्नात देखील भरीव वाढ होईल अशी आशा आहे.