पुणे रिंग रोड प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या 117 गावांमधील नागरिकांसाठी आताची सर्वात मोठी अपडेट ! आता 'या' गावातील नागरिकांना....
Pune Ring Road Latest News : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून गेल्या काही वर्षांमध्ये विशेष प्रयत्न झाले आहेत. शासन आणि प्रशासनाने पुणे तसेच पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फुटावी आणि येथील नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी असंख्य प्रयत्न केले आहेत.
शासनाने तर मेट्रो देखील सुरू केली आहे. मात्र या प्रयत्नानंतरही पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील वाहतूक कोंडी फारशी कमी झालेली नाही. यामुळे शासनाने पुणे रिंग रोड प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाचे काम राज्य रस्ते विकास महामंडळ अर्थातच MSRDC कडे वर्ग करण्यात आले आहे.
दरम्यान पुणे रिंग रोड प्रकल्पांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुणे रिंग रोड प्रोजेक्ट चा एक भाग म्हणून, 117 गावांच्या सर्वांगीण विकासाचे व्यवस्थापन MSRDC द्वारे केले जाणार आहे.
या अनुषंगाने या गावांसाठी एमएसआरडीसी ला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या भागात दोन आर्थिक विकास केंद्रांच्या विकासाचा या प्रकल्पात समावेश आहे.
याबाबतची अधिसूचना नगरविकास विभागाने 10 ऑक्टोबर रोजी जारी केली होती. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या उद्देशाने 112 मीटर रुंदीचा पुणे रिंगरोड प्रकल्प 172 किमीचा आहे.
प्रकल्पाची निविदा प्रक्रिया अंतिम करण्यात आली आहे, आणि त्याच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी एमएसआरडीसी पुणे रिंग रोड लिमिटेड (एमपीआरआरएल) या विशेष कंपनीची स्थापना करण्यात आली आहे.
रस्ते प्रकल्पाव्यतिरिक्त, MSRDC ला प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या 117 गावांच्या विकासाची जबाबदारी देण्यात आली आहे. पुणे रिंगरोड प्रकल्पांतर्गत या गावांमध्ये आर्थिक विकास केंद्रे स्थापन करण्याची तयारी दर्शवत एमएसआरडीसीने यापूर्वी नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.
यानुसार आता दोन आर्थिक विकास केंद्रे तयार केली जातील. एक हवेली, भोर आणि पुरंदर तालुक्यातील 62 गावे आणि दुसरे हवेली, मुळशी आणि वेल्हे तालुक्यातील 55 गावांचा समावेश करेल. ही केंद्रे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यक्षेत्रात 668 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात पसरलेले असतील.