पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! पुणे रेल्वे स्थानकावरून ‘या’ शहरासाठी सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, वाचा संपूर्ण टाईम टेबल
Pune Railway News : पुणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पुणे रेल्वे स्थानकावरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवणार आहे. ही गाडी पुणे ते करमाळा दरम्यान चालवली जाणार असून आज आपण याच विशेष एक्सप्रेस ट्रेन च्या संपूर्ण वेळापत्रक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर डिसेंबर महिन्यात येणाऱ्या नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे ते करमाळी दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते. नाताळ तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण कोकणात जाण्याचा प्लॅन बनवत असतात.
दरम्यान हीच भाग लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने ही विशेष गाडी चालवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानावर थांबणारे याबाबत माहिती पाहणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक
पुणे करमाळी विशेष एक्सप्रेस ट्रेन च्या एकूण तीन फेऱ्या होणार आहेत. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी (01407 विशेष गाडी ) दि. २५.१२.२०४ ते दि. ०८.०१.२०२५ पर्यंत दर बुधवारी पुणे रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार आहे.
या दिवशी ही गाडी ०५.१० वाजता पुणे येथून सुटेल आणि करमळी येथे त्याच दिवशी २०.२५ वाजता पोहोचणार आहे. तसेच करमाळी पुणे विशेष एक्सप्रेस ट्रेन चा देखील तीन फेऱ्या होणार आहेत. 01408 विशेष गाडी दि. २५.१२.२०२४ ते दि. ०८.०१.२०२५ पर्यंत दर बुधवारी करमाळी येथून २२.२० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता पोहोचणार आहे.
अर्थातच पुणे ते करमाळे अशा तीन आणि करमाळी ते पुणे अशा 3 म्हणजे एकूण सहा फेऱ्या या गाडीच्या आयोजित करण्यात आल्या आहेत. या फेऱ्यांमुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे. आता आपण ही विशेष गाडी कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबा घेणार याबाबत माहिती पाहुयात.
कुठे थांबणार?
रेल्वे प्रशासन आणि दिलेल्या माहितीनुसार याविषयी एक्सप्रेस ट्रेन ला चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
लोणावळ्या सहित कोकणातील अनेक महत्त्वाच्या स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला असल्याने पर्यटकांसाठी ही गाडी विशेष फायद्याची ठरणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळ्याला तसेच कोकणात जाणाऱ्या पर्यटकांसाठी या गाडीचा मोठा लाभ होईल अशी आशा व्यक्त होत आहे.