For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी ! नागपूरमार्गे 'या' शहरासाठी सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, कसं राहणार वेळापत्रक ? कोणकोणत्या स्टेशनवर थांबणार?

08:28 AM Nov 05, 2024 IST | Krushi Marathi
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी   नागपूरमार्गे  या  शहरासाठी सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन  कसं राहणार वेळापत्रक   कोणकोणत्या स्टेशनवर थांबणार
Pune Railway News
Advertisement

Pune Railway News : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. नुकताच दीपोत्सवाचा आनंददायी पर्व साजरा झाला आहे. दरम्यान दिवाळीनंतर रेल्वे प्रशासनाने छठपूजेच्या पार्श्वभूमीवर होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानी वरून अर्थातच पुण्यावरून विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

दोन दिवस या विशेष ट्रेनची सोय करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे पुण्यावरून सुटणारी ही विशेष एक्सप्रेस ट्रेन उपराजधानी नागपूर मार्गे धावणार आहे. खरे तर दिवाळीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत असते.

Advertisement

दिवाळीनंतरही प्रवाशांची संख्या लगेचच कमी होत नाही. सोबतच दिवाळीनंतर छटपूजेसाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. यामुळे हीच अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने पुण्यातील हडपसर रेल्वे स्थानकावरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय.

Advertisement

हडपसर ते बिलासपुर दरम्यान ही विशेष गाडी चालवली जाणार असून आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

कसं राहणार वेळापत्रक?
ही स्पेशल ट्रेन बिलासपूर येथून ८ नोव्हेंबरला दुपारी २ वाजता मार्गस्थ होईल. त्यानंतर ती रायपूर, दुर्ग, मार्गे रात्री ८.२० वाजता नागपूरला पोहोचणार आहे मग दुसऱ्या दिवशी अर्थातच नऊ नोव्हेंबरला दुपारी एक वाजता पुण्यातील हडपसर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे.

Advertisement

तसेच ही विशेष गाडी हडपसर येथून नऊ नोव्हेंबरला तीन वाजता सोडली जाणार आहे आणि ही गाडी १० नोव्हेंबरला सकाळी ८.२० वाजता नागपूर स्थानकावर पोहोचणार आहे. मग येथून पुन्हा गोंदिया, दुर्ग, रायपूरमार्गे दुपारी ३.३० वाजता बिलासपूरला पोहोचणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही स्पेशल ट्रेन या मार्गावरील सर्वच महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. दौंड, अहमदनगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग, रायपूर इत्यादी महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला थांबा मंजूर राहणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली आहे.

Tags :