For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

Bhu-Sampadan: पुणेकरांची 22 वर्षाची प्रतीक्षा संपणार! महत्त्वाच्या ‘या’ रस्त्यासाठी 70 कोटींची तरतूद… लवकरच भूसंपादन होऊन कामाला सुरुवात

07:52 AM Mar 06, 2025 IST | Krushi Marathi
bhu sampadan  पुणेकरांची 22 वर्षाची प्रतीक्षा संपणार  महत्त्वाच्या ‘या’ रस्त्यासाठी 70 कोटींची तरतूद… लवकरच भूसंपादन होऊन कामाला सुरुवात
karve road
Advertisement

Pune News:- गेल्या २२ वर्षांपासून रखडलेला कर्वेनगर डीपी रस्त्याच्या भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी महापालिकेने विशेष कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. राजाराम पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यानच्या रस्त्यासाठी भूसंपादन करण्यासाठी तब्बल ६९ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. हा निधी मिळवण्यासाठी महापालिकेने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला असून, मिसिंग लिंक प्रकल्पांतर्गत हा निधी मंजूर झाल्यास रखडलेला रस्त्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.

Advertisement

पुणे शहरातील वाहतूककोंडी कमी करण्याच्या उद्देशाने महापालिकेने शिवणे ते खराडी दरम्यान रस्त्याचे नियोजन केले आहे, मात्र आवश्यक जागेच्या भूसंपादनामुळे हे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. याच रस्त्याचा भाग असलेल्या राजाराम पूल ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या डीपी रस्त्याच्या भूसंपादनाची समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. महापालिकेच्या पथ विभागाने उपलब्ध जागा ताब्यात घेऊन काही भागात काम सुरू केले असले तरी, संपूर्ण रस्ता तयार न झाल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Advertisement

कर्वेनगर परिसरात वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात

Advertisement

विशेषतः कर्वेनगर परिसरात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान, महापालिकेने सनसिटी ते कर्वेनगर दरम्यान नदीवर नवीन पूल उभारण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यास कर्वेनगरमधील लहान रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे.

Advertisement

त्यामुळे भविष्यातील अडथळे दूर करण्यासाठी कर्वेनगरमधील ४० हून अधिक सोसायट्यांतील रहिवाशांनी महापालिकेकडे रखडलेल्या डीपी रस्त्याच्या कामाला प्राधान्य देण्याची मागणी केली. काही आठवड्यांपूर्वी स्थानिक नागरिकांनी मानवी साखळी तयार करून या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. या नागरिकांच्या मागणीनंतर महापालिकेच्या पथ विभागाने महालक्ष्मी लॉन्स ते जावळकर उद्यान आणि जावळकर उद्यान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यानच्या ३९ जागा मालकांची बैठक घेतली.

Advertisement

या बैठकीत जागा मोजणीचा खर्च महापालिकेने करावा, तसेच भूसंपादन प्रक्रिया गतीमान होण्यासाठी वेगवेगळ्या विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेला विशेष कक्ष (सेल) स्थापन करावा, अशी मागणी करण्यात आली. महापालिकेने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच विशेष कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष कक्षात पथ विभाग, मालमत्ता विभाग, भूसंपादन विभाग, बांधकाम विभाग आणि विधी विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असेल.

आवश्यक भूसंपादनासाठी लागणारा निधी

भूसंपादनासाठी लागणारा निधी महालक्ष्मी लॉन्स ते जावळकर उद्यान या भागासाठी ५० कोटी रुपये आणि जावळकर उद्यान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या भागासाठी १९ कोटी रुपये असा एकूण ६९ कोटी रुपये आहे. भूसंपादनाच्या बदल्यात मोठ्या प्लॉटधारकांना एफएसआय (फ्लोअर स्पेस इंडेक्स) आणि टीडीआर (ट्रांसफर ऑफ डेव्हलपमेंट राईट्स) देण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाईल, तर लहान प्लॉटधारकांना रोख मोबदला देण्यात येईल. महापालिकेने राज्य शासनाकडे निधीसाठी प्रस्ताव पाठवला आहे आणि शासनाकडून निधी मंजूर झाल्यास या रखडलेल्या डीपी रस्त्याचे काम मार्गी लागण्यास मदत होईल.