For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार?

02:29 PM Dec 15, 2024 IST | Krushi Marathi
पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर  सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन  कोणकोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार
Pune Nagar Railway News
Advertisement

Pune Nagar Railway News : बारा वर्षांनी उत्तर प्रदेश येथील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान याच कुंभमेळ्यासाठी रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला असून पुणे ते मऊ दरम्यान एक विशेष एक्सप्रेस ट्रेन धावणार आहे. कुंभमेळ्यासाठी संपूर्ण जगभरातील भाविक प्रयागराज येथे जमा होत आहेत. पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणात भाविक प्रयागराजला जाणार आहेत.

Advertisement

याच पार्श्वभूमीवर भाविकांच्या माध्यमातून पुण्याहून अहिल्यानगरमार्गे कुंभमेळ्यासाठी विशेष गाडी चालवली गेली पाहिजे अशी मागणी केली जात होती. याच मागणीच्या अनुषंगाने रेल्वे विभागाने पुणे ते मऊ दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

या मार्गावर धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून ही अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

कस राहणार वेळापत्रक?

Advertisement

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार पुणे ते मऊ विशेष रेल्वे (गाडी क्रमांक ०१४५५) नवीन वर्षात चालवली जाणार आहे. ही गाडी नवीन वर्षात ८, १६ आणि २४ जानेवारी, ६, ८ आणि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता पुणे रेल्वे स्थानकावरून रवाना होणार आहे.

Advertisement

ही गाडी ज्या दिवशी रवाना होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता मऊला पोहोचणार आहे. तसेच परतीच्या प्रवासात मऊ ते पुणे विशेष गाडी (ट्रेन क्रमांक ०१४५६) मऊ रेल्वे स्थानकावरून ९ जानेवारी, १७, २५ जानेवारी, तसेच ७, ९ आणि २२ फेब्रुवारी रोजी धावणार आहे.

या दिवशी मऊ रेल्वे स्थानकावरून रात्री ११ वाजून ५० मिनिटांनी विशेष रेल्वे पुण्याकडे येणार आहे. ही गाडी मऊ स्थानकावरून रवाना झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजून ४५ मिनिटांनी पुण्याला पाेहोचणार आहे. आता आपण ही विशेष गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार हे पाहणार आहोत.

कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार

पुणे येथून सुटणारी ही गाडी अहिल्यानगर मार्गे चालवली जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या गाडीला अहिल्यानगर रेल्वे स्टेशनवर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे. यामुळे पुण्यासहित अहिल्यानगर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी देखील ही गाडी फायद्याची ठरणार आहे.

दौंड, अहिल्यानगर, बेलापूर, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, तलवडिया, छनेरा , खिरकीया, हरदा, बानापुरा, इटारसी, पिपरिया, नरसिंगपूर, जबलपूर, कटनी, मैहर, सतना, माणिकपूर, प्रयागराज छियोकी, चुनार, वाराणसी, शहागंज आणि आझमगड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा राहणार अशी माहिती समोर आली आहे.

Tags :