कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

पुणेकरांसाठी खुशखबर ! शहरात तयार होणार आणखी एक मेट्रो मार्ग, कसा राहू शकतो रूट ? वाचा…..

12:34 PM Dec 18, 2024 IST | Krushi Marathi
Pune Metro News

Pune Metro News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी शासन आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. यासाठी विविध रस्ते विकासाचे प्रकल्प आणि मेट्रोची कामे केली जात आहेत. सध्या शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो धावत आहे.

Advertisement

हे दोन्ही मेट्रो मार्ग महा मेट्रो कडून विकसित करण्यात आले असून या मार्गांमुळे पुणेकरांचा प्रवास हा सुपरफास्ट झाला आहे. विशेष म्हणजे महामेट्रो कडून या मार्गांचा विस्तार देखील केला जाणार आहे. दुसरीकडे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातूनही मेट्रो मार्ग विकसित केला जातोयं.

Advertisement

शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मेट्रो मार्ग विकसित केला जात आहे. या मेट्रो मार्गाचे काम पीपीपी म्हणजेच पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्त्वावर पूर्ण केले जात आहे. सरकारी खाजगी तत्त्वावर होणारा हा महाराष्ट्रातील पहिलाच मेट्रो मार्ग प्रकल्प आहे.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी दरम्यान नियोजित मेट्रो सार्वजनिक, खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वानुसार साकारण्यात येत आहे. त्यासाठी जर्मनमधील एक खासगी कंपनीही सहयोगी आहे.

Advertisement

तब्बल सात हजार कोटींच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. महत्त्वाची बाब अशी की भविष्यात हिंजवडी आणि खराडी आयटी पार्क यादरम्यानही मेट्रो धावणार आहे. पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडच्या संचालक नेहा पंडित यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

Advertisement

पंडित यांनी भविष्यात हिंजवडी आणि खराडी आयटी पार्क एकमेकांना मेट्रो मार्गाने जोडण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे विधान केले आहे. यामुळे आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या पुण्यातील कामगारांना याचा मोठा लाभ मिळणार आहे.

शिवाजीनगर ते हिंजवडी हा मेट्रो मार्ग येत्या काही महिन्यांनी पुणेकरांच्या सेवेत दाखल होणार आहे. यामुळे शिवाजीनगर ते हिंजवडी हा प्रवास वेगवान होणार आहे. दुसरीकडे याच मेट्रो मार्गाचा विस्तार करत हिंजवडी ते खराडी आयटी पार्क दरम्यान मेट्रो मार्ग तयार करण्याचा मानस अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

नक्कीच पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात मेट्रो मार्गाचे जे जाळे विकसित होत आहे त्यामुळे या शहरांमधील वाहतुकीची समस्या बऱ्यापैकी कमी होणार आहे. पुणे शहरातील मेट्रोचे जाळे रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी करण्यात फायदेशीर ठरणार असून यामुळे पुण्यातील प्रदूषण देखील कमी होणार आहे.

Tags :
Pune Metro News
Next Article