पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ऐन दिवाळीच्या काळात पुणे मेट्रोचे वेळापत्रक कोलमडणार, 'या' दिवशी मेट्रो बंद राहील
Pune Metro News : पुणे शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे पुण्यातील मेट्रो संदर्भात. सध्या पुणे शहरात पिंपरी चिंचवड महापालिका ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो धावत आहे.
या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या देखील खूपच उल्लेखनीय आहे. मात्र ऐन दीपावलीच्या काळात मेट्रोचे वेळापत्रक कोलमडणार असे दिसते. कारण की मेट्रो प्रशासनाने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मेट्रो बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला असल्याची माहिती प्रशासनाच्या माध्यमातून समोर आली आहे.
यामुळे पुणे शहरातील मेट्रो प्रवाशांना लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. स्वतः मेट्रो प्रशासनाने या संदर्भात माहिती दिलेली आहे. खरेतर, सध्या देशभरात दिवाळीच्या सणाला मोठ्या उत्साहात सुरूवात झालीये.
आज नरक चतुर्दशी आहे. उद्या लक्ष्मीपूजन. १ नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन साजरा होणार आहे. दरम्यान या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. कारण की, याच दिवशी पुणे मेट्रो सेवा सायंकाळी ६ वाजेनंतर बंद ठेवण्याचा निर्णय पुणे मेट्रो प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
यासंदर्भात मेट्रो प्रशासनाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती दिली आहे. मेट्रो प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, "कृपया लक्ष द्या!! पुणे मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्वाची सूचना, शुक्रवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने पुणे मेट्रोची सेवा
सकाळी ६ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत उपलब्ध असेल. पण, सायंकाळी ६:०० ते रात्री १०:०० दरम्यान मेट्रोची सेवा बंद असेल. मात्र तदनंतर मेट्रोची सेवा पूर्ववत होणार आहे. शनिवार, दिनांक २ नोव्हेंबर २०२४ पासून पुणे मेट्रोची सेवा
नेहमीप्रमाणे सकाळी ६:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत सुरळीत सुरू असेल. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत." यामुळे पुणे शहरातील नागरिकांनी मेट्रो प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाच्या अनुषंगाने आपल्या प्रवासाचे नियोजन आखावे जेणेकरून त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही असे म्हटले जात आहे.