कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

पुणेकरांसाठी चिंताजनक बातमी ! CNG च्या दरात मोठी वाढ, किती वाढलेत दर ? वाचा….

12:49 PM Dec 29, 2024 IST | Krushi Marathi
Pune CNG News

Pune CNG News : गेल्या काही वर्षांपासून देशातील सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे पूर्णपणे बेजार झाली आहे. दरम्यान, महागाईने त्रस्त सर्वसामान्य जनतेची पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. ही बातमी पुणेकरांची चिंता वाढवणारी राहणार आहे. कारण की, महागाईने होरपळत असणाऱ्या पुण्यातील सर्वसामान्य जनतेला आता पुन्हा एकदा वाढत्या महागाईचा सामना करावा लागणार आहे.

Advertisement

पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात CNGच्या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यामुळे सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार सीएनजी प्रोव्हायडर एमएनजीएलने सीएनजीच्या दरांमध्ये 1.10 रुपये प्रति किलो एवढी वाढ केली आहे.

Advertisement

महत्त्वाचे म्हणजे हे नवीन दर आज अर्थातच 29 डिसेंबर 2024 पासून लागू होणार असल्याची माहिती कंपनीकडून समोर आली आहे. पूर्वी सीएनजी साठी सर्वसामान्य नागरिकांना 87.90 प्रति किलो याप्रमाणे पैसे मोजावे लागत होते. मात्र आता सीएनजी साठी 89 रुपये प्रति किलो या दराने पैसे मोजावे लागणार आहेत.

आजपासून पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात सीएनजीसाठी आजपासून 89 रुपये मोजावे लागणार आहेत. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (MNGL) सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 1.10 रुपयांची वाढ केली आहे. आता CNG साठी 89 रुपये मोजावे लागणार आहे.

Advertisement

हे नवीन आजपासून लागू झाले आहेत. या दरवाढीमुळे सीएनजी कार असणाऱ्या वाहनधारकांचा आर्थिक खर्च वाढणार आहे. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुणेकरांनी कंपनीच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे.

Advertisement

आम्ही आपणास सांगू इच्छितो की नुकत्याच दोन-तीन दिवसांपूर्वी मुंबईत देखील सीएनजीच्या दरात वाढ झाली होती. त्याआधीही मुंबई सीएनजीचे दर दोन रुपयांनी वाढले होते. सीएनजीच्या तरात दोन रुपयांची वाढ झाल्यानंतर मुंबईत आणखी एक रुपयांची वाढ करण्यात आली.

म्हणजेच गेल्या काही दिवसांमध्ये राजधानी मुंबई सीएनजीचे दर तीन रुपयांनी वाढले आहेत आणि आता पुण्यात सीएनजीचे दर 1.10 पैशांनी वाढवण्यात आले आहेत. यामुळे मुंबई पाठोपाठ आता पुण्यातील नागरिकांना देखील सीएनजी साठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. महागाईने होरपळत असणाऱ्या मुंबई आणि पुण्यातील जनतेसाठी नक्कीच एक मोठी चिंतेची बातमी आहे.

Tags :
Pune CNG News
Next Article