For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

Property Registry Rule: घर विकत घेतलं? सावधान! ही चूक झाली तर रजिस्ट्री होईल रद्द… ही महत्त्वाची माहिती वाचा

07:00 PM Mar 04, 2025 IST | Krushi Marathi
property registry rule  घर विकत घेतलं  सावधान  ही चूक झाली तर रजिस्ट्री होईल रद्द… ही महत्त्वाची माहिती वाचा
property registry
Advertisement

Sale Deed Rule:- दिल्ली-एनसीआर, मुंबई, लखनौ किंवा इतर कोणतेही शहर असो, घर किंवा जमीन खरेदी करताना योग्य कागदपत्रांची पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जमीन किंवा घर खरेदी करताना विक्री करार (सेल डीड किंवा खरेदी खत), भाडेपट्टा (लीज) करार किंवा सबलीज करार यातील फरक समजून घेणे आवश्यक आहे. फ्लॅटमध्ये गुंतवणूक करताना ज्या जमिनीवर सोसायटी बांधली जात आहे ती जमीन भाडेपट्ट्यावर आहे की सबलीज आहे की सेल डीडद्वारे हस्तांतरित झाली आहे, याची शहानिशा करणे अत्यंत गरजेचे आहे.

Advertisement

सेल डीड किंवा खरेदी खत म्हणजे काय?

Advertisement

खरेदी खत हे स्थावर मिळकतीच्या मालकी हक्काचा प्रथम आणि सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो. जमिनीचे मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्यासाठी खरेदी खत करणे आवश्यक असते. कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात सर्वप्रथम खरेदी खत महत्त्वाचे ठरते. या दस्तऐवजात जमिनीचा व्यवहार कोणत्या तारखेला, कोणत्या व्यक्तीने, किती क्षेत्रावर आणि किती किंमतीला केला आहे, याची सविस्तर माहिती असते.

Advertisement

खरेदी खत केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर नवीन मालकाची नोंद होते. मात्र, रजिस्ट्री झाली म्हणजे तुमची मालमत्ता सुरक्षित झाली असे गृहित धरू नका. काही परिस्थितींमध्ये ही नोंदणी रद्दही केली जाऊ शकते. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे आवश्यक आहे.

Advertisement

मालमत्ता हस्तांतरणाचे प्रकार आणि कायदेशीर सुरक्षितता

Advertisement

जर तुम्हाला मालमत्ता खरेदी करायची असेल, तर विक्री करार असलेल्या मालमत्तेला प्राधान्य द्या. अशा मालमत्तेचा व्यवहार स्टॅम्प पेपरवर केला जातो आणि यामध्ये मालकी हक्क पूर्णपणे हस्तांतरित होतात. त्यानंतर ही नोंदणी अधिकृत रजिस्ट्री ऑफिसमध्ये होते. महानगरपालिकेकडून देखील दाखल-खारीज प्रक्रियेद्वारे मालमत्तेचा ताबा मिळतो. सर्वोच्च न्यायालयाने देखील ही प्रक्रिया अधिक सुरक्षित मानली आहे.

खरेदी खत करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

सातबारा उतारा

फेरफार उतारे

व्यवहार करणाऱ्या व्यक्तींचे आधार आणि पॅन कार्ड तसेच फोटो

मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरल्याची पावती

साक्षीदार म्हणून दोन ओळखीच्या व्यक्तींचे फोटो आणि आधार कार्ड

NA ऑर्डरची प्रत

रजिस्ट्री झाल्यानंतरही ती रद्द होऊ शकते का?

एकदा जमिनीची कायदेशीर रजिस्ट्री झाल्यानंतर तलाठी अशा व्यवहाराचा फेर घेतात. मालकी हक्काच्या नोंदीत बदल झाल्यास त्याची नोंद फेरफारात ठेवली जाते आणि मालमत्ता खरेदी करणाऱ्याच्या नावावर सातबारा उतारा केला जातो. मात्र, हा फेर घेण्याआधी तलाठी कार्यालयामार्फत नोटीस जारी केली जाते. १५ दिवसांच्या आत कोणत्याही व्यक्तीने हरकत घेतली, तर ती रजिस्ट्री रद्द होऊ शकते.

जर विक्रेत्याला विक्रीची पूर्ण रक्कम मिळाली नाही किंवा विक्री करणाऱ्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी किंवा हिस्सेदारांनी हरकत घेतली, तर जमीन व्यवहार रोखला जाऊ शकतो आणि दावा सिद्ध झाल्यास रजिस्ट्री रद्द होऊ शकते. ही प्रक्रिया तहसील कार्यालय आणि मंडळ अधिकाऱ्यांकडे पार पडते. मात्र, जर तुम्हाला संपूर्ण खरेदी खतच रद्द करायचे असेल, तर सर्वोच्च न्यायालयात जावे लागते.

जमीन किंवा घर खरेदी करताना फक्त सेल डीड करून निश्चिंत राहू नका. कायदेशीर प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण झाली आहे का, याची खात्री करा. सातबारा उताऱ्यावरील नाव नोंदणी, हरकत कालावधी आणि व्यवहार पूर्णपणे पारदर्शक आहे का याची शहानिशा करणे गरजेचे आहे. अन्यथा, नंतरच्या टप्प्यावर अडचणी निर्माण होऊ शकतात आणि तुम्हाला मोठ्या कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे संपत्ती खरेदी करताना सर्व कागदपत्रे नीट तपासा आणि सुरक्षित व्यवहार करा.