कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

पी एम किसान योजना : 19 वा हफ्ता कधीपर्यंत जमा होणार ? वाचा सविस्तर

10:04 AM Nov 02, 2024 IST | Krushi Marathi
Pm Kisan Yojana

Pm Kisan Yojana : पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक कामाची अपडेट समोर येत आहे. खरे तर पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात.

Advertisement

हे पैसे दोन हजाराचा एक हप्ता याप्रमाणे वितरित होतात. प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचा एक हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो. आतापर्यंत या योजनेचे एकूण 18 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

Advertisement

शेतकऱ्यांना आता या योजनेच्या पुढील हप्त्याची आतुरता लागली आहे. या योजनेचा मागील 18 वा हप्ता हा गेल्या महिन्यात जमा करण्यात आला होता. 5 ऑक्टोबर 2024 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला.

आपल्या राज्यातील ही लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. तसेच आता या योजनेचा हप्ता नेमका कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार याबाबत एक नवीन माहिती समोर आली आहे.

Advertisement

कधी जमा होणार पीएम किसान चा पुढील हप्ता?
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा मागील 18 वा हप्ता 5 ऑक्टोबरला जमा झाल्यानंतर आता 19 वा हप्ता देखील येत्या काही महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

Advertisement

खरे तर या योजनेचे पैसे प्रत्येक चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात यानुसार फेब्रुवारी 2025 महिन्यापर्यंत या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे.

फेब्रुवारी 2025 अखेरपर्यंत या योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना 19 व्या हप्त्याचे दोन हजार रुपये दिले जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होत आहे. तथापि या संदर्भात केंद्रातील सरकारकडून कोणतीच अधिकृत माहिती हाती आलेली नाही.

यामुळे आता या योजनेचा पुढील हप्ता नेमका कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे. दरम्यान या योजनेचा पुढील हप्ता तुम्हाला मिळणार की नाही हे कसे तपासायचे या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

लाभार्थी यादीत नाव कसे चेक करणार?
https://pmkisan.gov.in/ या सरकारच्या वेबसाईटवर जा. मग तेथे beneficiary Status ( लाभार्थी स्थिती) हा पर्याय निवडा. यानंतर तुमचा आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक प्रविष्ट करा. पुढे "डेटा मिळवा" यावर क्लिक करा.

यानंतर, तुमचे सर्व तपशील स्क्रीनवर दिसतील. या तपशीलांद्वारे तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल की नाही हे कळू शकते. या लाभार्थी यादीत तुमची माहिती असेल तर तुम्हाला नक्कीच याचा पुढील हप्ता मिळणार आहे.

Tags :
PM Kisan Yojana
Next Article