कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

शेतकऱ्यांनो, सावधान! PM Kisan लिंकद्वारे मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश… लिंकला क्लिक केल्यास खात्यातून होतील पैसे गायब.. ही काळजी घ्या

12:12 PM Mar 06, 2025 IST | Krushi Marathi
pm kisan

PM Kisan News:- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी राबवली जाते. मात्र, सध्या या योजनेसंदर्भात ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढले असून, बनावट लिंकद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली जात आहे. शेतकऱ्यांच्या मोबाइलवर "पीएम किसान यादी" किंवा "पीएम किसान ॲप" अशा प्रकारचे मेसेज पाठवून फसवणुकीचा प्रयत्न केला जात आहे. ही लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यातील रक्कम चोरटे परस्पर काढून घेत आहेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी दिली आहे.

Advertisement

बनावट लिंकचा फसवणुकीसाठी होत आहे वापर

Advertisement

मोबाइलवर ‘PM Kisan List APK’ किंवा ‘PM Kisan APK’ अशा लिंक पाठवून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे. या बनावट ॲप्लिकेशनद्वारे फोन हॅकिंग, वैयक्तिक माहितीची चोरी आणि आर्थिक फसवणुकीचे प्रकार उघडकीस आले आहेत. चोरटे अशा लिंक मुद्दामहून शेतकरी ग्रुप, सोशल मीडियावर आणि मेसेजिंग अॅप्सद्वारे पाठवत आहेत, त्यामुळे अनावधानाने त्या उघडल्या जात आहेत.

शेतकऱ्यांनी घ्यावयाची दक्षता

Advertisement

शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही बनावट लिंक किंवा ॲप्लिकेशनवर क्लिक करू नये. अधिकृत माहितीसाठी फक्त पीएम किसान योजनेची अधिकृत वेबसाईट (https://pmkisan.gov.in/) आणि सरकारी ॲपचाच वापर करावा.

Advertisement

जर कोणी अशा फसवणुकीचा शिकार झाला असेल किंवा अशा घटना आढळून आल्यास, तातडीने जवळच्या सायबर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी. कोणतीही बँक किंवा सरकारी विभाग तुमच्या खात्याची माहिती, ओटीपी किंवा अन्य वैयक्तिक माहिती मागत नाही, त्यामुळे कोणालाही अशी माहिती देऊ नये.

सतर्क राहून आर्थिक फसवणुकीपासून वाचणे आवश्यक

पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांच्या आर्थिक हितासाठी राबवली जात असली, तरी सायबर गुन्हेगार याचा गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळणे आवश्यक आहे. आपल्या बँक खात्याची आणि वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा लिंकद्वारे शेअर करू नये. तसेच, अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत इतर शेतकऱ्यांनाही सतर्क करणे गरजेचे आहे.

सरकार आणि सायबर विभाग अशा प्रकारच्या फसवणुकीवर कारवाई करत आहेत, मात्र आपली सुरक्षा आपल्या हातात असल्याने अशा प्रकारच्या बनावट लिंकपासून सावध राहणे आणि सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

Next Article