PM Kisan 2025 : ह्या शेतकऱ्यांना PM Kisan चा 19वा हफ्ता मिळणार नाही ! पहा यादी
PM Kisan 2025 : नमस्कार शेतकरी बांधवानो ! तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे, ती म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे. केंद्र सरकार 24 फेब्रुवारी 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील हफ्त्याचे पैसे पाठवणार आहे. पण काही शेतकऱ्यांना यावेळी हा हप्ता मिळणार नाही. म्हणून कोणत्या शेतकऱ्यांना 19वा हप्ता मिळणार अन कोणाला याचा लाभ मिळणार नाही ? यासोबतच हप्ता मिळवण्यासाठी कोणत्या गोष्टींची पूर्तता करावी लागेल ?
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना सुरु केली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी तीन हप्त्यांमध्ये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. अर्थातच दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पैशांचे वितरण होते. आतापर्यंत या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना 18 हप्ते देण्यात आले आहेत, आणि आता सर्वांना 19व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे की, 24 फेब्रुवारी 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी 19वा हप्ता जारी करतील. देशभरातील 13 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मागील अठरावा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाशिम येथून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला होता. 5 ऑक्टोबर 2024 रोजी 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला.
आता 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहार येथील भागलपूर मधून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे. पण पीएम किसानचा पुढील हप्ता सर्वच शेतकऱ्यांना मिळणार का? तर उत्तर आहे नाही. या योजनेचा 19 वा हप्ता सर्वच शेतकऱ्यांना मिळणार नाही. कारण सरकारने काही पात्रता, अटी ठरवल्या आहेत. चला मग पाहूयात कोणत्या शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही.
📌 संस्थात्मक जमीनधारक शेतकरी – ज्या शेतकऱ्यांकडे संस्थात्मक शेती जमीन आहे, त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही.
📌 सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक – जर एखादा शेतकरी सरकारी कर्मचारी असेल किंवा त्याला दरमहा 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळत असेल, तर तो अपात्र ठरेल.
📌 उच्च उत्पन्न असलेले व्यावसायिक – डॉक्टर, अभियंते, वकील, चार्टर्ड अकाउंटंट आणि आर्किटेक्ट यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
📌 आयकर भरणारे शेतकरी – जर एखादा शेतकरी इन्कम टॅक्स भरत असेल, तर त्याला हप्ता मिळणार नाही.
📌 चुकीची किंवा अपूर्ण माहिती देणारे शेतकरी – अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास लाभ मिळणार नाही.
📌 ई-केवायसी न केलेले शेतकरी – जर ई-केवायसी केले नसेल, तर हप्ता थांबवला जाईल.
📌 बँक खाते आधारशी लिंक नसलेले शेतकरी – जर खात्यात तांत्रिक समस्या असतील, तर हप्ता येणार नाही.
📌 जमिनीच्या नोंदीत तफावत असलेले शेतकरी – जर जमिनीच्या कागदपत्रांमध्ये तफावत असेल तर याचा लाभ मिळणार नाही.
मित्रांनो, जर तुम्हाला 19वा हप्ता वेळेत आणि कोणतीही अडचण न येता मिळवायचा असेल तर ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा, बँक खाते आधारशी लिंक आहे का? हे तपासा, शेतजमिनीचे रेकॉर्ड व्यवस्थित आहेत का? याची खात्री करा, फॉर्ममध्ये कोणतीही चुकीची माहिती दिली नाही ना? याची खात्री करून घ्या.
मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, तर व्हिडीओला लाइक, शेअर आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील, तर खाली कॉमेंटमध्ये नक्की विचारा ! पुन्हा भेटूयात आणखी एक नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार.