Pik Vima Application : शेतकऱ्यांसाठी खुशखबर ! पीक विमा मंजूर झाला आहे का? आता फक्त दोन मिनिटांत घरबसल्या माहिती मिळवा!
Pik Vima Application : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे पीक विमा मंजूर झाला आहे की नाही, याची माहिती फक्त दोन मिनिटांत मोबाईलवर मिळवता येणार आहे. यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, कारण प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा (PMFBY) अधिकृत चॅटबॉट उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पीक विमा अर्जाची स्थिती कशी तपासावी?
देशभरातील अनेक शेतकऱ्यांनी खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की त्यांचा पीक विमा मंजूर झाला आहे की नाही, त्यांचा क्लेम किती आहे आणि कधी मिळेल? या सर्व शंकांचे समाधान एका सोप्या प्रक्रियेतून होऊ शकते.
PMFBY WhatsApp चॅटबॉटचा वापर करून माहिती मिळवा
पीक विमा संदर्भात माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला PMFBY चॅटबॉटचा अधिकृत व्हॉट्सअॅप नंबर - 70 65 51 44 47 सेव्ह करावा लागेल. एकदा हा नंबर सेव्ह केल्यानंतर पुढील प्रक्रिया करा:
व्हॉट्सअॅप उघडा आणि PMFBY क्रमांकावर "Hi" असा मेसेज पाठवा.
तुम्हाला एक मेनू मिळेल, जिथे खालील पर्याय दिसतील:
- पॉलिसी स्टेटस (Insurance Policy Status)
- पॉलिसी क्रॉप लॉस इंटीमेशन
- क्लेम स्टेटस
- तिकीट स्टेटस
- प्रीमियम कॅल्क्युलेटर
"पॉलिसी स्टेटस" या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर तुम्हाला खरीप 2024 आणि रब्बी 2024 असे दोन पर्याय मिळतील.
तुमच्या विम्याचा हंगाम निवडा (उदा. खरीप 2024).
तुमच्या पॉलिसीचा क्रमांक, अर्ज क्रमांक, गावाचे नाव, पीकाचे नाव, सर्वे नंबर, भरलेली रक्कम, विमा कंपनीचे नाव, सरकारने दिलेला हप्ता, विमा पॉलिसीची स्थिती अशा सर्व बाबी स्क्रीनवर दिसतील.
क्लेम स्टेटस कसा पाहावा?
जर तुम्हाला क्लेम स्टेटस पाहायचा असेल, तर मुख्य मेनूमधून "क्लेम स्टेटस" हा पर्याय निवडा आणि खरीप किंवा रब्बी हंगाम निवडून पुढे जा. येथे तुमच्या अर्जाचा क्रमांक आणि क्लेम स्टेटस स्पष्टपणे दिसेल. यामुळे तुम्हाला विम्याचा क्लेम कधी मिळेल, याबद्दलची अचूक माहिती मिळू शकेल.
पीक विमा माहिती घरबसल्या मिळवण्याचा सोपा उपाय!
या सुविधेमुळे शेतकऱ्यांना बँक किंवा सरकारी कार्यालयांमध्ये चकरा मारण्याची गरज उरणार नाही. फक्त एक व्हॉट्सअॅप मेसेज करून पीक विम्याची संपूर्ण माहिती दोन मिनिटांत मिळवता येईल.