Mentha Crop: शेतीत नफ्याचा नवा मार्ग! या पिकाची लागवड करून 90 दिवसात उत्पन्न तिप्पट करा.. शेतीचा होईल कायापालट
Farming Business Idea:- शेतकरी आणि उद्योजकांसाठी मेंथा शेती हा एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो. हे एक औषधी वनस्पती असलेले पीक असून त्याचा उपयोग हर्बल उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणावर केला जातो. कोरोना महामारीनंतर हर्बल आणि आयुर्वेदिक औषधांची मागणी झपाट्याने वाढली आहे, त्यामुळे पारंपरिक शेतीसोबत औषधी वनस्पतींची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी अधिक फायद्याचे ठरत आहे. मेंथा शेती केवळ अल्पावधीत जास्त उत्पादन देत नाही, तर मातीच्या सुपीकतेसाठीही फायदेशीर आहे.
भारतात मेंथा शेती कुठे केली जाते?
भारतात राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात आणि पंजाब या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर मेंथा शेती केली जाते. विशेषतः उत्तर प्रदेशातील बदायूं, रामपूर, बरेली, पिलीभीत, बाराबंकी, फैजाबाद, आंबेडकर नगर आणि लखनऊ या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर या पिकाची लागवड होते. कारण या भागात या पिकासाठी योग्य हवामान आणि सुपीक माती उपलब्ध आहे.
मेंथाची लागवड फेब्रुवारी ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान केली जाते आणि साधारणतः ९० ते ११० दिवसांत पीक तयार होते. या पिकाला मध्यम ओलावा आवश्यक असतो, त्यामुळे दर आठवड्याला पाणी द्यावे लागते. जून महिन्यात स्वच्छ हवामान असल्यास पिकाची कापणी केली जाते आणि त्यानंतर त्यापासून तेल काढले जाते.
मेंथा शेती फायद्याची
शेतकऱ्यांसाठी मेंथा शेती हा एक मोठ्या उत्पन्नाचा स्रोत ठरू शकतो. एका हेक्टर क्षेत्रात मेंथा शेती केल्यास साधारणतः १२५ ते १५० किलो मेंथा तेल मिळते. या शेतीसाठी लागणारा खर्च कमी असतो, साधारणतः २०,००० ते २५,००० रुपये प्रति एकर इतका खर्च येतो.
बाजारात मेंथा तेलाची किंमत १००० ते १५०० रुपये प्रति किलो असल्याने एका हंगामात १ लाख रुपयांपर्यंत कमाई होऊ शकते. विशेष म्हणजे, या पिकाचा कालावधी फक्त ३ ते ४ महिने असल्यामुळे एका वर्षात तीन वेळा मेंथा शेती करता येते आणि त्यामुळे वारंवार मोठ्या प्रमाणावर नफा मिळवता येतो.
मेंथा शेती पारंपरिक पिकांपेक्षा अधिक फायदेशीर ठरते कारण ती कमी कालावधीत अधिक उत्पादन देते आणि बाजारात त्यास सतत मोठी मागणी असते. त्यासोबतच, या पिकामुळे मातीचे आरोग्य सुधारते आणि इतर पिकांच्या तुलनेत त्यावर रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. शेतकऱ्यांना अल्पभांडवलात मोठा नफा मिळवून देणारे हे पीक असल्यामुळे अनेक शेतकरी या शेतीकडे वळत आहेत. त्यामुळेच मेंथा शेतीला "हिरवे सोने" असेही संबोधले जाते. जर तुम्ही कमी खर्चात जास्त नफा मिळवायचा विचार करत असाल, तर मेंथा शेती तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.