For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

आनंदाची बातमी ! नवरात्र उत्सवाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील या बाजारात कांद्याला मिळाला सर्वाधिक दर, वाचा सविस्तर

09:12 PM Oct 07, 2024 IST | Krushi Marathi
आनंदाची बातमी   नवरात्र उत्सवाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातील या बाजारात कांद्याला मिळाला सर्वाधिक दर  वाचा सविस्तर
Onion Rate
Advertisement

Onion Rate : गेल्या काही दिवसांपासून कांद्याचे दर तेजीत आहेत. ही तेजी नवरात्र उत्सवाच्या काळात कमी होईल असे वाटत होते. कारण की नाफेड चा कांदा आता बाजारात आला आहे. पण नवरात्र उत्सवाच्या काळातही कांद्याचे दर तेजितच आहेत.

Advertisement

त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. आज नवरात्र उत्सवाचा पाचवा दिवस आणि आज राज्यातील आई बाजारांमध्ये कांद्याचे दर हे 5000 रुपये प्रति क्विंटल पेक्षा अधिक नमूद करण्यात आले आहेत.

Advertisement

आज राज्यातील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे. या एपीएमसी मध्ये आज लाल कांद्याला किमान 500, कमाल 5250 आणि सरासरी 2600 असा दर मिळाला आहे.

Advertisement

आज कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 1500, कमाल 5,100 आणि सरासरी तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.

Advertisement

तसेच नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज उन्हाळी कांद्याला किमान 3800 कमाल 5 हजार 50 आणि सरासरी 4350 असा भाव मिळाला आहे. दरम्यान आता आपण राज्यातील इतर काही बाजारांमध्ये बाजार भाव थोडक्यात जाणून घेणार आहोत.

Advertisement

राज्यातील प्रमुख बाजारांमधील कांद्याचे बाजार भाव

पुणे पिंपरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 2500, कमाल 4800 आणि सरासरी 3450 असा भाव मिळाला आहे.

मुंबई कांदा बटाटा मार्केट : या बाजारात कांद्याला किमान 2500, कमाल 4700 आणि सरासरी 3600 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.

राहुरी वांबोरी कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला किमान 500, कमाल 4500 आणि सरासरी 3500 असा भाव मिळाला आहे.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 2500, कमाल 4500 आणि सरासरी 3500 असा दर मिळाला आहे.

कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 1500 कमाल 4500 आणि सरासरी तीन हजार रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे.

Tags :