कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

शेतकऱ्यांनो कांद्याला कमी दर मिळतोय ? मग कांदा प्रक्रिया उद्योग सुरू करा, जबरदस्त कमाई होणार

01:38 PM Jan 01, 2025 IST | Krushi Marathi
Onion Process Business

Onion Process Business : कांद्याला नगदी पिकाचा दर्जा मिळाला आहे. देशात कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. यातील सर्वाधिक उत्पादन आपल्या महाराष्ट्रात होते. राज्यातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर अशा विविध जिल्ह्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जात असून राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे या पिकावर अर्थकारण अवलंबून आहे.

Advertisement

पण कांदा बाजार भावात नेहमीच अनिश्चितता राहिली आहे. गेल्या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत कांद्याला चांगला दर मिळाला होता. लोकसभा निवडणुकीनंतर कांदा बाजार भावात सुधारणा झाली होती आणि जवळपास महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत कांद्याचे दर तेजीत होते.

Advertisement

विधानसभा निवडणुकीनंतरही काही काळ कांद्याचे दर तेजीत राहिलेत. मात्र, महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेनंतर कांदा बाजारभावात घसरन सुरू झाली आहे. नवीन कांदा बाजारात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्यानंतर बाजारभावात घसरण झाली आणि यामुळे सध्या शेतकरी बांधव चिंतेत आले आहेत. मात्र जर शेतकऱ्यांनी कांद्यावर प्रक्रिया करणारा उद्योग सुरू केला तर त्यांना चांगला फायदा मिळू शकणार आहे.

यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी कंपनी स्थापित करून प्रक्रिया उद्योग सुरू करायला हवा. शेतकरी गटाने प्रक्रिया उद्योग सुरू केला तर शेतकऱ्यांना नक्कीच याचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण कांदा प्रक्रिया उद्योगाची थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

Advertisement

कसा आहे कांदा प्रक्रिया उद्योग?

Advertisement

कांदा प्रक्रिया उद्योगात कांद्याचे निर्जलीकरण केले जाते आणि बाय प्रॉडक्ट तयार होतो. कांदा निर्जलीकरण प्रक्रियेमध्ये कांद्याचे छोटे तुकडे करून त्यांना ड्रायरद्वारे किंवा उन्हात वाळवले जाते. वाळवलेले कांद्याचे तुकडे नंतर ग्राइंडरमध्ये दळून कांदा पावडर बनवली जाते.

सदरील पावडर बाजारात मसाले किंवा फूड प्रोसेसिंग उद्योगांना विकली जाते. यासाठी शेतकऱ्यांना कमाल पाच लाख रुपयांचे भांडवल आवश्यक असते. शेतकऱ्यांकडे कांदा प्रक्रिया उद्योग करण्यासाठी आवश्यक भांडवल उपलब्ध नसेल तर ते यासाठी कर्ज देखील घेऊ शकतात.

हा उद्योग सुरू करण्यासाठी कांदा कापण्यासाठी कटिंग मशीन, कांदा वाळवण्यासाठी सोलर ड्रायर, आणि पावडर तयार करण्यासाठी ग्राइंडर मशीन आदींची आवश्यकता असते. याशिवाय पॅकेजिंग मशिन आणि इतर साधनांची सुद्धा आवश्यकता भासते.

तसेच सौर ऊर्जा ड्रायर सारख्या पर्यावरणपूरक उपायांचा वापर करून बाय प्रॉडक्ट तयार करण्यासाठी येणारा खर्चही कमी करता येऊ शकतो. या व्यवसायातून तयार होणारे बाय प्रॉडक्ट मसाले कंपन्यांना, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, तसेच वेफर्स आणि स्नॅक्स उत्पादक कंपन्यांना विकता येऊ शकतो. यातून शेतकऱ्यांना चांगली कमाई होऊ शकते.

Tags :
Onion Process Business
Next Article