कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाच्या कामास गती! केंद्र सरकारने काढले राजपत्र; भूसंपादनाची प्रक्रिया सुरू

07:56 PM Jan 19, 2025 IST | Sonali Pachange
manmad-indore railway

Manmad-Indore Railway:- बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चीत असलेला राज्यातील सगळ्यात महत्त्वाचा रेल्वे मार्ग जर असेल तर तो म्हणजे मनमाड ते इंदूर हा प्रस्तावित रेल्वे मार्ग आहे. या महत्त्वाच्या असलेल्या रेल्वे मार्गाला आता केंद्र सरकार व रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून गती देण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे.

Advertisement

त्यामुळे आता या रेल्वेमार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनींचे अधिग्रहण करण्यासाठी आवश्यक असलेले राज्यपत्र केंद्र सरकारने काढले असून उपजिल्हाधिकारी भूसंपादन नाशिक यांची सक्षम अधिकारी याकरिता नियुक्त करण्यात आला आहे.

Advertisement

14 जानेवारी रोजी हे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले असून त्यानुसार जर बघितले तर 399.43 किलोमीटर लांबीचा हा प्रस्तावित रेल्वे मार्गाकरिता नाशिक जिल्ह्यातील नांदगाव व मालेगाव तालुक्यातील जमीन अधिग्रहण करण्याकरिता सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे केंद्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन्ही महत्त्वाच्या राज्यांना कनेक्टिव्हिटी मिळण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असलेल्या या रेल्वे मार्गाला विशेष मार्गाचा दर्जा देखील दिला असून या रेल्वे मार्गाचे काम आता प्राधान्याने केले जाणार आहे व त्यामुळे जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया देखील आता सुरू करण्यात आली आहे.

Advertisement

या गावांमधून केले जाणार भूसंपादन
मनमाड- इंदूर रेल्वे मार्गासाठी आता भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे व यामध्ये नांदगाव तालुक्यातील मनमाड, अस्तगाव, खादगाव, पांझणदेव, नवसारी, भारडी या गावातून तर मालेगाव तालुक्यातील चोंडी जळगाव, काळेवाडी, घोडेगाव, घोडेगाव चौकी, वऱ्हाणे, संवदगाव, सायने, चिखलओहोळ,

Advertisement

मेहू, ज्वार्डी, येसगाव, मालनगाव आणि झोडगे इत्यादी गावातील जमिनी संपादित केल्या जाणार आहेत. गेल्या काही महिनाअगोदर केंद्र सरकारच्या माध्यमातून या रेल्वे मार्गाच्या कामाला गती देऊन वाढीव आर्थिक निधीची तरतूद करण्यात आलेली होती व त्यानुसार धुळे ते नरडाणे येथील कामास गती मिळाली आहे.

मनमाड-इंदोर रेल्वे मार्गावर असणार 34 रेल्वे स्टेशन
मनमाड- इंदूर रेल्वे मार्गावर जवळपास 34 रेल्वे स्टेशन बनवण्यात येणार असून त्यातील 17 स्टेशन महाराष्ट्रात तर 17 स्टेशन मध्यप्रदेशमध्ये असणार आहेत. या माध्यमातून दोन्ही राज्यातील सहा जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत.

Next Article