सोनिकाने करून दाखवले तुम्हीही करू शकता ! फक्त 25 हजार रुपयात हा व्यवसाय सुरू करा, 12 ते 15 लाख रुपयांपर्यंतची उलाढाल होऊ शकते !
New Business Idea : कोरोना काळापासून भारतात नोकरी ऐवजी व्यवसायाला प्राधान्य दाखवले जात आहे. नोकरीमध्ये शाश्वती नसल्याने आता अनेक जण व्यवसायाकडे वळले आहेत. व्यवसायासाठी शासनाच्या माध्यमातून नागरिकांना मदतही केली जात आहे. नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी सरकार विविध योजना चालवत असून या योजनांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात मदत सुद्धा उपलब्ध होत आहे.
मात्र व्यवसाय सुरू करताना सर्वसामान्य तरुणांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. कोणता व्यवसाय सुरू करावा हे सुचत नाही. दरम्यान, आज आपण मेरठ येथील एका महिलेची यशोगाथा जाणून घेणार आहोत जिने अवघ्या 25 हजार रुपयांमध्ये व्यवसाय सुरू केला, पण आजच्या घडीला या प्रयोगशील महिलेने आपला व्यवसाय 12 ते 13 लाख रुपयांच्या टर्नओव्हर पर्यंत पोहोचवला आहे.
मेरठ येथील सोनिका यांनी ही किमया साधली आहे. सोनिका यांनी झाडू बनवण्याचे प्रशिक्षण घेऊन झाडू बनवण्याचा व्यवसाय सुरू केला. त्या मेरठच्या रॉली चौहान गावातील महिला. खरे तर त्यांचा हा व्यवसायाचा प्रवास वाटतो तेवढा सोपा नव्हता.
त्यांचे पती हे पेंटर होते. मात्र पेंटिंग चे काम कधी मिळायचे तर कधी मिळत नसत. यामुळे आपला संसार कसा चालवायचा हा प्रश्न नेहमीच त्यांच्या उरावर असायचा. अशा या बिकट परिस्थितीमध्ये त्यांनी झाडू बनवण्याचे प्रशिक्षण घेतले.
सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी स्वतः आपल्या घरात झाडू बनवायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी 25 हजार रुपयांची इन्व्हेस्टमेंट केली होती. त्यांनी बनवलेले झाडू उत्कृष्ट क्वालिटीचे होते यामुळे दुकानदारांना त्यांचा माल आवडला आणि नंतर मोठ्या प्रमाणात त्यांना ऑर्डर येऊ लागल्यात.
व्यवसाय वाढल्यानंतर त्यांचे पती आणि गावातील अन्य काही महिला त्यांच्या या व्यवसायात सहभागी झाल्यात. जेव्हा सोनिका त्यांनी व्यवसाय सुरू केला तेव्हा त्या स्वतः झाडू विक्री करत यासाठी ते स्वतः झाडू बाजारात घेऊन जात.
मात्र, नंतरच्या काळात त्यांचा व्यवसाय वाढला आता ते थेट ट्रकने आपला माल दुकानदारांपर्यंत पोहोचवतात. फक्त मेरठ मध्येच नाही तर दिल्लीमध्ये देखील त्यांचा झाडू विकला जातो. सोनिकाचे पती जे आधी पेंटिंग चे काम करत ते आता त्यांच्या या व्यवसायात मार्केटिंगची जबाबदारी हाताळत आहेत.
महत्वाची बाब अशी की आजच्या घडीला त्यांच्या या व्यवसायाची उलाढाल 10 ते 12 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. सोनिका यांच्या या व्यवसायात ज्या महिला काम करत आहेत त्यांना 800 ते हजार रुपये रोज त्या देतात. एवढेच नाही तर ते आजूबाजूच्या जिल्ह्यात महिलांना झाडू बनवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी सुद्धा जातात.