For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा रूट थोडा बदलणार, 90 किमीचे अंतर वाढणार ! वाचा सविस्तर

08:09 PM Dec 08, 2024 IST | Krushi Marathi
नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा रूट थोडा बदलणार  90 किमीचे अंतर वाढणार   वाचा सविस्तर
Nashik Pune Railway
Advertisement

Nashik Pune Railway : नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रस्तावित रेल्वे मार्गाचे अंतर जवळपास 80 ते 90 किलोमीटरने वाढणार असा अंदाज आहे. या प्रस्तावित केलेल्या मार्गात रेडिओ दुर्बिणीचा अडसर असल्याने रेडिओ दुर्बिणीला वळसा घालून नवा मार्ग विकसित केला जाणार आहे.

Advertisement

या अनुषंगाने या प्रकल्पाचा नवीन डीपीआर तयार केला जात असून या डीपीआरचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे. यामुळे मात्र या मार्गाचे अंतर ९० किलोमीटरने वाढण्याची शक्यता आहे.

Advertisement

खासदार राजाभाऊ वाजे यांनी या प्रकल्पासंदर्भात चर्चा करण्यासाठी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या रेल्वे मार्ग प्रकल्पासाठी येणारे अडथळे दूर करून या प्रकल्पाला गती मिळावी यासाठी खासदार महोदयांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेतली.

Advertisement

यावेळी केंद्रीय रेल्वेमंत्री वैष्णव यांनी रेडिओ दुर्बिणीमुळे नव्याने तयार करण्यात येत असलेला आराखडा (डीपीआर) अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली असून या रेल्वे मार्गाचे अंतर 80 ते 90 किलोमीटरने वाढणार असेही सांगितले गेले आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की हा रेल्वे प्रकल्प जुन्याच प्रस्तावित मार्गाने होणार आहे.

Advertisement

पण, महारेलच्या माध्यमातून बनविण्यात आलेल्या आराखड्यात (डीपीआर) नारायणगाव येथील 'जीएमआरटी' आणि नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्सद्वारे चालविली जाणारी जायंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (रेडिओ दुर्बीण) या प्रकल्पातून रेल्वेमार्ग प्रस्तावित करण्यात आला होता.

Advertisement

ही बाब रेल्वे मंत्रालयाच्या लक्षात आल्यानंतर या प्रकल्पासाठी नव्याने डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले. हाच डीपीआर आता अंतिम टप्प्यात आला असून येत्या काही दिवसात याचे काम पूर्ण होईल आणि त्यानंतर या प्रकल्पाचे पुढील काम हाती घेतले जाणार आहे.

हा प्रकल्प नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे या तीन जिल्ह्यांसाठी फायद्याचा राहणार आहे. या प्रकल्पामुळे नाशिक ते पुणे दरम्यान चा प्रवास वेगवान होणार आहे.

नाशिक आणि पुणे या दोन शहरादरम्यान रेल्वे कनेक्टिव्हिटी उपलब्ध नसल्याने या दोन्ही शहरादरम्यान रेल्वेचा मार्ग झाला पाहिजे अशी मागणी येथील नागरिकांच्या माध्यमातून सातत्याने उपस्थित केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर हा सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला असून या मार्गासाठी नवा डीपीआर तयार होत आहे.

दरम्यान या प्रकल्पासाठी जो नवीन डीपीआर तयार होत आहे त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत हे सर्व काम पूर्ण होईल आणि त्यानंतर या प्रकल्पाला मंजुरी मिळेल अशी माहिती समोर येत आहे.

Tags :