कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

मुंबईहुन धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्यांना लोणावळा रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर !

11:01 AM Oct 14, 2024 IST | Krushi Marathi
Mumbai To Lonavala Railway

Mumbai To Lonavala Railway : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ही बातमी राजधानीमधील रेल्वे प्रवाशांसाठी अधिक खास राहणार आहे. विशेषतः जे मुंबई ते लोणावळा असा प्रवास करतात त्यांच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने प्रवाशांची सुविधा वाढवण्याच्या उद्देशाने 10 ऑक्टोबर 2024 पासून लोणावळा स्थानकावर अनेक महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर केला आहे.

Advertisement

मुंबईहून धावणाऱ्या काही एक्सप्रेस गाड्यांना या ठिकाणी थांबा मिळणार आहे. हा थांबा प्रायोगिक तत्वावर मंजूर करण्यात आला आहे. म्हणजेच कायमस्वरूपी हा थांबा राहणार नाही. प्रायोगिक तत्वावर मंजूर करण्यात आलेल्या या थांब्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला तर पुढेही हा थांबा कंटिन्यू होऊ शकतो.

Advertisement

पण, या प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आलेल्या थांब्यामुळे प्रवाशांचा प्रवास हा फारच सोयीचा होणार आहे. लोणावळा हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. या पर्यटन स्थळी दररोज मोठ्या संख्येने पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते.

पावसाळा, हिवाळा तसेच उन्हाळ्यात देखील या ठिकाणी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मुंबईहूनही मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळ्याला फिरण्यासाठी जात असतात. यातील बहुतांशी जनता ही रेल्वेने जाते.

Advertisement

अशा परिस्थितीत मुंबईहून धावणाऱ्या काही महत्वाच्या गाड्यांना येथे थांबा मंजूर करण्यात आला असल्याने याचा रेल्वे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. दरम्यान आता आपण मुंबईहून धावणाऱ्या कोणत्या एक्सप्रेस गाड्यांना लोणावळा रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

Advertisement

१२१६३ लोकमान्य टिळक टर्मिनस - एमजीआर चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेसला प्रायोगिक तत्त्वावर लोणावळा येथे थांबा देण्यात आला आहे. ही ट्रेन लोणावळ्याला 20:56 ला येईल अन 20:58 ला निघेल. तसेच, १२१६४ एमजीआर चेन्नई - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसलाही प्रायोगिक तत्त्वावर लोणावळा येथे थांबा मिळाला आहे. ही गाडी 12:40 ला लोणावळा रेल्वे स्थानकावर येईल आणि 12:42 ला येथून रवाना होणार आहे.

11139 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - होसापेटे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला सुद्धा लोणावळा येथे प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्यात आला आहे. रेल्वेने सांगितल्याप्रमाणे ही गाडी लोणावळा रेल्वे स्थानकावर 23:51 वाजता येईल आणि 23:53 ला ही गाडी येथून रवाना होणार आहे. 

Tags :
Mumbai To Lonavala Railway
Next Article