मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! दादर रेल्वे स्थानकावरून मराठवाड्यातील ‘या’ शहरासाठी सुरू होणार रेल्वेगाडी, कस राहणार Timetable?
Mumbai Railway News : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे जाणाऱ्या मराठवाड्यातील अनुयायांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी येथे अनुयायांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी संपूर्ण जगभरातील समाज बांधव या दिवशी दादर येथील चैत्यभूमीवर गर्दी करत असतात. दरम्यान महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर होणाऱ्या अतिरिक्त गरजेच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायांसाठी रेल्वे कडून अनेक विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. मराठवाड्यातील नांदेड ते दादर दरम्यान ही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.
दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबणार ? यासंदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार वेळापत्रक?
चैत्यभूमी येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांची मोठी गर्दी होणार असून याच अनुयायांसाठी दक्षिण मध्य रेल्वेने एक विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या माध्यमातून आदीलाबाद ते दादर दरम्यान विशेष गाडी चालवली जाणार आहे.
त्यामुळे नांदेड सहित मराठवाड्यातील समाज बांधवांना या गाडीचा मोठा लाभ मिळणार आहे. या विशेष गाडीच्या वेळापत्रकाबाबत बोलायचं झालं तर गाडी क्रमांक ०७०५८ ही विशेष गाडी ५ डिसेंबर रोजी रवाना होईल.
या दिवशी ही ट्रेन सकाळी सात वाजता ही गाडी (०७०५८) आदिलाबाद स्थानाकावरून प्रस्थान करेल, तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटे ३:३० वाजता दादर स्थानकावर पोहोचेल.
तर परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक (०७०५७) ही गाडी ७ डिसेंबर रोजी दादरवरून सुटणार आहे. या दिवशी ही गाडी पहाटे १:०५ वाजता दादर स्थानाकवरून सुटेल, तर त्याच दिवशी सायंकाळी ६:४५ वाजता आदिलाबाद येथे पोहोचणार आहे.
विशेष गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबा घेणार?
दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी नांदेड, पूर्णा, परभणी, मानवत रोड, सेलू, परतूर, जालना, छत्रपती संभाजी नगर या रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबा घेणार आहे.