आनंदाची बातमी, मुंबईहून सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन ! 'या' 18 रेल्वे स्थानकावर थांबा घेणार, पहा....
Mumbai Railway News : येत्या काही दिवसांनी दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. दीपोत्सवाला आता अवघ्या काही दिवसांचा काळ शिल्लक राहिला आहे. यामुळे सध्या संपूर्ण देशभरात आनंदाचे वातावरण आहे. दीपोत्सवाच्या काळात मुंबई, पुण्यासारख्या मेट्रो शहरांमध्ये रोजगार, शिक्षण, व्यवसाय निमित्त स्थायिक झालेली जनता आपल्या मूळ गावाला परतत असते.
यंदाही दीपोत्सवाच्या काळात अनेक जण आपल्या मूळ गावाला परतणार आहेत. परिणामी, दरवर्षी दीपोत्सवाच्या काळात एसटी आणि रेल्वे गाड्यांमध्ये मोठी गर्दी असते. यंदाही एसटी आणि रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची संख्या वाढणार आहे.
दरम्यान ही अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून दादर रेल्वे स्थानकावरून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू केली जाणार आहे. दादर - काजीपेट साप्ताहिक विशेष गाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
ही गाडी या मार्गावरील 18 महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार हे विशेष. अशा परिस्थितीत, आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कस राहणार या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक?
दादर- काजीपेट साप्ताहिक विशेष दि. २८.११.२०२४ ते दि. ३०.०१.२०२५ दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर गुरुवारी दादर रेल्वे स्थानकावरून सोडली जाणार असून या गाडीच्या एकूण नऊ फेऱ्या होणार आहेत.
तसेच काजीपेट- दादर साप्ताहिक विशेष दि. २७.११.२०२४ ते दि. २९.०१.२०२५ या कालावधीत चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी दर बुधवारी काजीपेट रेल्वे स्थानकावरून सोडली जाईल आणि या गाडीच्या देखील नऊ फेऱ्या होणार आहेत.
कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी या मार्गावरील कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हजूर साहिब नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, बसर, निजामाबाद, आरमुर, मेटपल्ली, कोराटला आणि लिगंमपेट जगित्याल या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.