आनंदाची बातमी! मुंबईहून 'या' शहरासाठी सुरू होणार एक नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसं असणार नवीन वेळापत्रक ? वाचा सविस्तर
Mumbai Railway News : मुंबईकरांसाठी एक अतिशय कामाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरातील नागरिकांसाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून एक विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे.
ही गाडी मुंबईहून पुण्या मार्गे मराठवाड्यासाठी चालवली जाणार आहे. ही गाडी मुंबई ते लातूर दरम्यान चालवली जाणार आहे. खरंतर दरवर्षी दसरा आणि दिवाळीच्या सणादरम्यान मुंबईहून मराठवाड्यात जाणाऱ्यांची संख्या वाढत असते.
यंदाही दसरा आणि दिवाळीच्या सणाला मुंबईहुन मराठवाड्यात जाणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. हीच संभाव्य अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने आता मुंबई ते लातूर दरम्यान विशेष गाडी चालवण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, आज आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसं राहणार वेळापत्रक ?
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी 19 ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर या काळात चालवली जाणार आहे. ही गाडी पुण्या मार्गे चालवली जाणार आहे. यामुळे मुंबई, पुण्यासहित मराठवाड्यातील प्रवाशांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे.
या काळात ही गाडी दर शनिवारी रात्री बारा वाजून 30 मिनिटांनी सीएसएमटी येथून निघणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी अकरा वाजून 40 मिनिटांनी लातूर येथे पोहोचणार आहे.
ही गाडी लातूर येथून सायंकाळी चार वाजून 30 मिनिटांनी रवाना होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी चार वाजून दहा मिनिटांनी मुंबईला पोहोचणार आहे.
कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार
मिळालेल्या माहितीनुसार ही विशेष एक्सप्रेस या मार्गावरील दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, उरुळी, दौंड, भिगवण, जेऊर, केम, कुर्दुवाडी, बारशी, उस्मानाबाद, हरंगुळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे. यामुळे या संबंधित भागातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचा नक्कीच फायदा होणार आहे.