For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

अहिल्यानगर, पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! दिवाळीत सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, 'या' 12 स्टेशनंवर थांबणार, वेळापत्रक पहा...

10:51 AM Oct 25, 2024 IST | Krushi Marathi
अहिल्यानगर  पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी   दिवाळीत सुरू होणार विशेष एक्सप्रेस ट्रेन   या  12 स्टेशनंवर थांबणार  वेळापत्रक पहा
Mumbai Pune Railway
Advertisement

Mumbai Pune Railway : येत्या काही दिवसांनी देशात दिवाळी व छट पूजेचा मोठा आनंददायी पर्व साजरा होणार आहे. या सणासुदीच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. दरम्यान हीच प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेता, या सणानिमित्त पुणे आणि मुंबईवरून अनेक विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.

Advertisement

पुणे ते नागपूर या दरम्यानही विशेष एक्सप्रेस ट्रेन सुरू होणार आहे. ही गाडी अहिल्या नगर मार्गे चालवली जाणार आहे. यामुळे नगर मधील रेल्वे प्रवाशांना देखील या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.

Advertisement

अहिल्यानगर मार्गे धावणारी ही गाडी दिवाळी सणाच्या काळात प्रवाशांसाठी फायदेशीर ठरेल आणि प्रवाशांचा मनस्ताप कमी होईल अशी आशा आहे.

Advertisement

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या शहरा दरम्यान दिवाळीत होणाऱ्या गर्दीमुळे अतिरिक्त उत्सव विशेष ट्रेन धावतील. आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या स्थानकावर थांबणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

Advertisement

कसे राहणार विशेष ट्रेनचे वेळापत्रक?

Advertisement

सेंट्रल रेल्वेने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, नागपूर -पुणे - नागपूर द्वि-साप्ताहिक विशेष एक्सप्रेस ट्रेन 28 ऑक्टोबर ते आठ नोव्हेंबर दरम्यान धावणार आहे.

या काळात या विशेष गाड्यांच्या नागपूर ते पुणे यादरम्यान तीन आणि पुणे ते नागपूर या दरम्यान तीन अशा एकूण सहा फेऱ्या होणार आहेत.

गाडी क्र. ०१२०१ (नागपूर - पुणे द्वि-साप्ताहिक उत्सव विशेष) नागपूर येथून २८ ऑक्टोबर, ४ व ७ नोव्हेंबर रोजी १९.४० वाजता सुटणार आहे आणि पुणे येथे दुसर्‍या दिवशी ११.२५ वाजता पोहचणार आहे.

तसेच गाडी क्र.०१२०२ अर्थात पुणे - नागपूर द्वि-साप्ताहिक उत्सव विशेष एक्सप्रेस पुणे येथून २९ ऑक्टोबर, १ व ५, ८ नोव्हेंबर या तारखेला १५.३० वाजता सुटणार आहे आणि नागपूर येथे दुसर्‍या दिवशी ६.३० वाजता पोहचणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबणार ही विशेष गाडी

ही विशेष गाडी पुणे ते नागपूर दरम्यानच्या अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबणार आहे. वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, बेलापुर, अहमदनगर, दौंड कॉर्ड लाईन उरुळी या महत्त्वाच्या स्थानकावर ही विशेष गाडी थांबा घेणार आहे.

Tags :