राजधानी मुंबईनंतर महाराष्ट्रातील ‘या’ शहराला मिळणार बुलेट ट्रेनची भेट, कसा असणार रोडमॅप? वाचा……
Mumbai Bullet Train Project : गेल्या दहा-बारा वर्षांच्या काळात भारतीय रेल्वेने मोठी नेत्रदीपक प्रगती साधली आहे. या एका दशकाच्या काळात रेल्वेने आपले नेटवर्क विस्तारित करण्यावर विशेष लक्ष दिले. जे भाग रेल्वेने जोडलेले नव्हते त्या भागात रेल्वे लाईन टाकण्याचे काम झाले.
एवढेच नाही तर वंदे भारत एक्सप्रेस सारख्या हाय स्पीड ट्रेन देखील सुरू करण्यात आल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा खूपच जलद आणि सुरक्षित झाला आहे. विशेष बाब अशी की भारतात लवकरच बुलेट ट्रेन देखील धावणार आहे.
मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावणार असून सध्या या प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. येत्या काही महिन्यांनी या प्रकल्पाचे काम पूर्ण होईल आणि प्रत्यक्षात बुलेट ट्रेन रुळावर धावताना दिसणार आहे.
दुसरीकडे आता देशाला लवकरच दुसऱ्या बुलेट ट्रेन ची भेट मिळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम येत्या काही महिन्यांनी सुरू होणार असे दिसते. ही दुसरी बुलेट ट्रेन महाराष्ट्रातच धावणार आहे.
उपराजधानी नागपूर ते राजधानी मुंबई दरम्यान बुलेट ट्रेन चालवण्याची घोषणा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यामुळे मुंबई ते नागपूर दरम्यानचा प्रवास वेगवान होणार आहे. दरम्यान आता आपण याच मुंबई नागपूर बुलेट ट्रेन प्रकल्प संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कसा राहणार नागपूर मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प?
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनचा मार्ग हा 766 किलोमीटर लांबीचा राहणार आहे. या 766 किलोमीटर लांबीच्या मार्गावर एकूण 13 स्थानके विकसित केली जाणार आहेत. या बुलेट ट्रेन मार्गाची विशेषता म्हणजे हा मार्ग काही ठिकाणी समृद्धी महामार्गाला समांतर राहणार आहे.
६० टक्क्याहून अधिक भाग समृद्धी महामार्गाला समांतर राहणार अशी माहिती अधिकार यांनी दिली आहे. या प्रकल्पामुळे विदर्भाच्या विकासाला चालना मिळणार आहे. विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासाठी बुलेट ट्रेन फायद्याची ठरेल असा विश्वास व्यक्त होतोय.
या मार्गावर नागपूर, खापरी, वर्धा, पुलगाव, करंजा लाड, मालेगाव जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, आणि शहापूर अशी तेरा स्थानके विकसित होणार आहेत.
या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू झाल्यास मुंबई ते नागपूर दरम्यान चा प्रवास अवघ्या साडेतीन तासात पूर्ण करता येईल असा विश्वास जाणकारांनी व्यक्त केला आहे.