शेतकऱ्यांनो काळजी घ्या…… वातावरणात झाला मोठा बिगाड, ‘या’ तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता
देशात नुकताच होळीचा मोठा सण साजरा झाला, काल संपूर्ण राज्यात धुलीवंदनाचा सण उत्साहात साजरा झाला असून आता राज्यासहित देशातील काही भागांमध्ये तापमानात वाढ पाहायला मिळत आहे. तसेच आगामी काळात तापमानात आणखी वाढ होणार असे आयएमडीने स्पष्ट केले आहे. असे असतानाच मात्र देशातील जवळपास 18 राज्यांमध्ये भारतीय हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा अंदाज घेण्यात आला आहे.
दरम्यान, आता आपण भारतीय हवामान खात्याने देशातील कोणत्या राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे, महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार? राज्याच्या कोणत्या भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे? याबाबतचा भारतीय हवामान खात्याचा सविस्तर अंदाज जाणून घेणार आहोत. नमस्कार मी… आणि तुम्ही पाहत आहात कृषी मराठी हे आमचं नाव यूट्यूब चैनल.
मित्रांनो, सध्या उत्तर भारतात तापमान वाढण्यास सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे इराक आणि बांगलादेशातून येणाऱ्या चक्रीवादळांमुळे उत्तर भारत, पूर्व भारत आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चक्रीवादळांमुळे पुढील काही दिवसांत देशातील काही भागात थंडी परतण्याची शक्यता आहे.
किंबहुना राज्याच्या काही ठिकाणी गेल्या दोन-तीन दिवसात थंडीची चाहूल लागली आहे. तसेच या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये वादळी पाऊस, गारपीट आणि काही ठिकाणी जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता सुद्धा आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांना पुन्हा एकदा फटका बसण्याची भीती असून शेतकऱ्यांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशातील जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये 15 मार्चपर्यंत जोरदार हिमवृष्टी, पाऊस आणि गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे. पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची हजेरी असेल अन राजस्थानमध्येही 15 मार्चपर्यंत ढगाळ वातावरणाचा आणि काही भागांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममध्ये जोरदार हिमवृष्टी होण्याची शक्यता असून, आसाम, मेघालय, मणिपूर, नागालँड आणि त्रिपुरामध्ये पावसासोबत वादळी वारे वाहतील असे बोलले जात असून या अनुषंगाने या संबंधित राज्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दक्षिण भारताबाबत बोलायचं झालं तर येथील तामिळनाडू आणि केरळमध्ये 15 मार्चपर्यंत बहुतांशी भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या राज्यांमधील किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक राहील. म्हणून समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आपल्या महाराष्ट्रात मात्र भारतीय हवामान खात्याकडून तब्बल 20 मार्चपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
म्हणजे आजपासून पुढील सहा दिवस राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार असा अंदाज आहे. आज पासून पुढील सहा दिवस म्हणजेच 20 मार्च 2025 पर्यंत राज्यातील मराठवाडा विभागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असे बोलले जात आहे.
अवकाळी पावसामुळे राज्यातील तापमानात काही प्रमाणात घट होईल, मात्र नागरिकांनी सतर्क राहावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे. एकंदरीत राज्यात पुढील सहा दिवस पावसाचा अंदाज असून हा पाऊस सर्वदूर पडणार नाही तर फक्त मराठवाडा विभागात पावसाची हजेरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे.