For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

मुंबई आणि पुणे ही शहरे येणार जवळ! महत्त्वाचा असलेला ‘हा’ प्रकल्प जून महिन्यात होणार वाहतुकीसाठी खुला

09:31 AM Jan 25, 2025 IST | Sonali Pachange
मुंबई आणि पुणे ही शहरे येणार जवळ  महत्त्वाचा असलेला ‘हा’ प्रकल्प जून महिन्यात होणार वाहतुकीसाठी खुला
missing link project
Advertisement

Missing Link Project:- दोन शहरे किंवा कुठल्याही दोन राज्यांमधील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी रस्ते प्रकल्पांना अनन्य साधारण महत्व असते. त्याच दृष्टिकोनातून जर महाराष्ट्रामध्ये बघितले तर अनेक रस्ते प्रकल्पांची कामे सध्या सुरू आहेत व काही प्रकल्प हे प्रस्तावित आहेत.

Advertisement

त्यामुळे जेव्हा येणाऱ्या काळात ही सगळी प्रकल्प पूर्णत्वास येतील तेव्हा वाहतुकीच्या दृष्टिकोनातून देखील हे खूप महत्त्वाचे ठरणार आहे व कृषी आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टिकोनातून देखील अशा प्रकल्पांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

Advertisement

अगदी याच पद्धतीने जर आपण महाराष्ट्रातील दोन प्रमुख शहरे म्हणजेच मुंबई आणि पुणे यांच्या अनुषंगाने बघितले तर या दोन्ही शहरांच्या दरम्यान प्रचंड प्रमाणात वाहतूक असते व या दोन्ही शहरा दरम्यानची वाहतूक सुलभ व्हावी व प्रवास वेगात करता यावा यासाठी मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंक म्हणजेच पर्यायी रस्त्याचे काम सुरू आहे व हे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे.

Advertisement

अनेक प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करत हे काम सुरू ठेवण्यात आले असून येत्या जून पर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल असा अंदाज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement

मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवास 13.3 किलोमीटरने होणार कमी
मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गावर तयार केल्या जात असलेल्या प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवास 13.3 किलोमीटरने कमी होणार आहे. लोणावळ्याजवळ जर आपण बघितले तर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग व मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार हे खालापूर टोलनाक्याजवळ एकत्र येतात आणि पुढे खंडाळा एक्झिट येथे वेगळे होतात.

Advertisement

या ठिकाणी आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट हा रस्ता सहा पदरी आहे व या भागात दहा पदरी वाहतूक येऊन मिळते व त्यामुळे खूपच मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होतात. तसेच हा घाट सेक्शन असल्यामुळे चढ-उताराचे प्रमाण देखील जास्त आहे.

या सगळ्या कारणांमुळे मुंबईकडे येणारा जो काही डोंगराकडूनचा भाग आहे तो पावसाळ्यात बंद ठेवावा लागतो व वाहतूक कोंडी व्हायला लागते. त्यामुळे आता मुंबई ते पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली एक्झिट ते कुसगाव या भागातील 13.3 किलोमीटर लांबीच्या पर्यायी रस्त्याचे काम आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे.

कशी आहे या मिसिंग लिंक प्रकल्पाच्या कामाची प्रगती?
या पर्याय रस्त्यावरील लोणावळा येथून जाणाऱ्या खोपोली एक्झिट पासून ते सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंत उभारल्या जात असलेल्या 19.8 किलोमीटर अंतराच्या बोगद्याचे काम देखील आता 90 टक्के पूर्ण झाले आहे.

तसेच या परिसरामध्ये डोंगराळ भाग असल्याने 130 मीटर उंचीच्या केबल पुलावर काँक्रीटीकरणाचे काम सध्या सुरू आहे व पावसाळ्यात या ठिकाणचे काम बंद करावे लागते. त्यामुळे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरच या पर्यायी रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे माहिती समोर आली आहे.

त्यामुळे येणाऱ्या जून महिन्यात काम पूर्ण करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.