For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

मोठी बातमी ! उद्या म्हाडाच्या ‘या’ 3662 घरांसाठी सोडत जाहीर होणार

05:24 PM Jan 28, 2025 IST | Sonali Pachange
मोठी बातमी   उद्या म्हाडाच्या ‘या’ 3662 घरांसाठी सोडत जाहीर होणार
Mhada News
Advertisement

Mhada News : मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे यांसारख्या शहरांमध्ये घरांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या शहरांमध्ये वाढणाऱ्या घरांच्या किमती पाहता सर्वसामान्य नागरिक आता हक्काच्या घरासाठी म्हाडाच्या घरांची आतुरतेने वाट पाहत असतात.

Advertisement

दरम्यान म्हाडाच्या विविध मंडळांच्या माध्यमातून दरवर्षी हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर केली जात असते. पुणे मंडळाने देखील ऑक्टोबर मध्ये हजारो घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. दरम्यान ऑक्टोबर मध्ये जाहीर करण्यात आलेल्या याचं घरांसाठीची संगणकीय सोडत उद्या अर्थातच 29 जानेवारी 2025 रोजी काढली जाणार आहे.

Advertisement

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही सोडत निघणार आहे. यावेळी राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सुद्धा उपस्थित राहणार अशी माहिती हाती आली आहे.

Advertisement

खरंतर दहा ऑक्टोबर 2024 रोजी पुणे मंडळाने 6420 घरांची योजना जाहीर केली होती. यामध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2758 घरांचा समावेश करण्यात आलाये. मंडळी या लॉटरीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2758 घरांचा समावेश असून यासाठी 1375 अर्ज प्राप्त झाले आहेत.

Advertisement

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेशिवाय या लॉटरीमध्ये पंढरपूर येथील म्हाडाच्या योजनेची 28, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील म्हाडाच्या योजनेची 65 आणि 20% सर्वसमावेशक योजनेतील 3569 घरांचा या लॉटरीमध्ये समावेश करण्यात आला.

Advertisement

म्हणजेच 3662 घरे ही सोडतीसाठी समाविष्ट करण्यात आली आणि या घरांसाठी 93 हजार 662 अर्ज प्राप्त झालेत. यातील 71,642 लोकांनी अनामत रक्कम भरली. दरम्यान आता ज्या लोकांनी अनामत रक्कम भरली आहे त्या लोकांचा उद्या निघणाऱ्या सोडतीसाठी समावेश करण्यात आला असून आता या 71 हजाराहून अधिक लोकांमधून कोणत्या लोकांना म्हाडाचे घर मिळते हे विशेष पाहण्यासारखे ठरणार आहे.

दरम्यान उद्या पार पडणारा हा सोडतीचा कार्यक्रम मंत्रालयातून ऑनलाइन होणार आहे. तसेच अर्जदारांसाठी झेडपीच्या शरदचंद्र पवार सभागृहात कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. एवढेच नाही तर अर्जदारांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक लिंक पाठवली जाईल ज्यावर अर्जदारांना घरबसल्या हा कार्यक्रम पाहता येईल.

एकंदरीत उद्या पार पडणाऱ्या या सोडतीच्या माध्यमातून हजारो लोकांचे घर खरेदीचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीलाच या लोकांना नव्या घराची भेट मिळणार आहे. यामुळे अर्जदारांचे विशेषता ज्यांनी अनामत रक्कम भरली आहे त्या सर्व अर्जदारांचे या सोडतीकडे विशेष लक्ष आहे.

Tags :