पावसाचे सत्र सुरूच राहणार ! 'या' पौर्णिमेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस सुरू राहणार, वाचा सविस्तर
Maharashtra Rain : महाराष्ट्रात सध्या परतीच्या पावसाच्या सत्र सुरू आहे. मात्र राज्यातील परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला आहे. खरंतर गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी वातावरण तयार झाले आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये परतीचा पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.
काल राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातही काही भागात जोरदार पावसाने दणका दिला. उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव, सटाणासहित कसमादे पट्ट्यात पावसाची तीव्रता अधिक पाहायला मिळाली.
दरम्यान आता भारतीय हवामान खात्याने राज्यातील पावसा संदर्भात एक नवीन अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात पुढील आठवड्यावर म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा पर्यंत पावसाची सक्रियता कायम राहणार आहे.
अर्थातच कोजागिरी पौर्णिमेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार असा अंदाज हवामान खात्याच्या माध्यमातून समोर आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील सोयाबीन कापूस समवेतच काढणीसाठी तयार असणाऱ्या पिकांची विशेष काळजी घ्यावी.
तसेच काढणी झालेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन करण्यात आले आहे. तथापि सध्या सुरू असणारा परतीचा पाऊस हा रब्बी हंगामातील पिकांसाठी विशेष फायद्याचा ठरणार आहे.
रब्बी हंगामातील गहू हरभरा यासारख्या पिकांना सध्या सुरू असणारा पाऊस वरदान सिद्ध ठरणार आहे. तथापि भारतीय हवामान खात्याने 15 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातील मान्सूनच्या परतीच्या पावसाच्या प्रवासाचे चित्र स्पष्ट होईल असे यावेळी आवर्जून नमूद केले आहे.
अर्थातच कोजागिरी पर्यंत तरी महाराष्ट्रातून मान्सून परतणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. तसेच, या आठवड्याभरात दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात जसे की सांगली, सोलापूर, कोल्हापूरसह आजूबाजूच्या परिसरात आणि दक्षिण कोकणात अर्थातच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
विदर्भातही काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला देण्यात आला आहे.