बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांवर होणार परिणाम, जोरदार पावसाची शक्यता !
Maharashtra Rain : महाराष्ट्रात दिवाळीच्या काळात पाऊस सुरू होता. त्यामुळे यंदा राज्यात थंडीला उशिराने सुरुवात झाली. दिवाळीनंतर राज्यात गुलाबी थंडीची चाहूल लागली. उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी भरवणारी थंडी जाणवू लागली. मात्र असे सुरू असतानाच गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात पावसाने दणका दिला. कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग आणि सातारा जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावल्याची नोंद करण्यात आली.
यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रातील थंडीची लाट थोडीशी कमी झाली आहे. थंडीची तीव्रता वाढणार असे संकेत मिळत असतानाच पावसामुळे राज्यातील बहुतांशी भागांमधील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू झाली आणि याचा परिणाम म्हणून राज्यातील थंडीची लाट आता थोडीशी ओसरलेली आहे.
मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आणि कोकणातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्याकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्रात आणि कोकणातील दक्षिणेकडे जिल्ह्यात गेल्या काही तासात पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचे म्हटले आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे केरळ आणि तामिळनाडू राज्यात मुसळधार पाऊस होत असून तेथील शेती पिकांना या पावसाचा फटका बसतोय.
या सगळ्याचा परिणाम राजधानी मुंबईसह महाराष्ट्रातही पाहायला मिळतोय. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्याच्या तापमानात हळूहळू घट होताना दिसत आहे. तसेच कमाल तापमानाचा देखील खाली आले आहे. महत्त्वाचे म्हणजे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि सांगली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. राज्यात आज ढगाळ वातावरणासह कमाल तापमानात चढ-उतार येण्याची शक्यता आहे. किमान तापमानात अंशतः घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी सुद्धा आज महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. डख यांनी दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. उर्वरित राज्यात मात्र हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे.
तसेच उद्यापासून आज ज्या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तिथे सुद्धा हवामान कोरडे होईल आणि थंडीची लाट येणार आहे. पंजाब रावांनी येत्या 20 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहणार असल्याचे सांगितले आहे. अर्थातच मतदानावर पावसाचे सावट राहणार नाही, मतदानाची प्रक्रिया पावसामुळे खोळंबणार नाही असे दिसते.