मोठी बातमी ! महाराष्ट्रात ‘हे’ तीन दिवस पावसाची शक्यता, कोण-कोणत्या जिल्ह्यांमध्ये अवकाळीची हजेरी लागणार?
Maharashtra Rain : नैऋत्य मान्सून नंतर आता देशातून ईशान्य मान्सूनने देखील काढता पाय घेतला आहे. दक्षिणेतील ईशान्य मान्सून आता परतला असून याच दरम्यान महाराष्ट्रात मात्र हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये भारतीय हवामान खात्यातील तज्ञांकडून पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवीन महिन्याची सुरुवात म्हणजेच फेब्रुवारीची सुरुवात ही अवकाळी पावसाने होणार आणि फेब्रुवारी च्या सुरुवातीचे तीन चार दिवस राज्यात पावसाचे सावट पाहायला मिळणार असल्याचा नवा अंदाज समोर आला आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण फेब्रुवारीतील पहिल्या आठवड्याचे महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार ? या संदर्भात हवामान खात्यात तज्ञांनी नेमके काय माहिती दिली आहे ? याबाबत सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान?
हवामान खात्यातील तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील १० ते १२ दिवस म्हणजे ६ फेब्रुवारीपर्यंत राज्यातील बहुतांशी भागांमध्ये किमान तापमान वाढणार आहे. राज्याच्या किमान तापमानात २ ते ३ अंशाने वाढ होणार आहे,
किमान तापमानात वाढ होणार असल्याने राज्यातील थंडी अजून कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, एकापाठोपाठ मार्गस्थ होणाऱ्या पश्चिमी झंजावातामुळे फेब्रुवारीमध्ये ही राज्यात थंडीचे प्रमाण कायम राहणार आहे. म्हणजे थंडी पूर्णपणे नाहीशी होणार नाहीये.
अर्थातच थंडी गायब होणार असे नाही तर फेब्रुवारी मधील काही दिवस थंडीची तीव्रता जाणवणार आहे. सध्या स्थितीला महाराष्ट्रात पावसाची शक्यता नाहीये मात्र फेब्रुवारीमध्ये काही ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
पुढील आठवड्यात दोन ते तीन दिवस ढगाळ हवामान राहील आणि अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्यातील तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे एक, दोन आणि पाच फेब्रुवारीला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
एक फेब्रुवारी रोजी राज्यातील लातूर, नांदेड, बीड, सोलापूर जिल्ह्यात किरकोळ पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तसेच 2 फेब्रुवारी रोजी अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, अकोला, बुलडाणा, वर्धा, अमरावती, हिंगोली, वाशिम या जिल्ह्यात किरकोळ पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
तसेच 5 फेब्रुवारीला लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज आहे.