For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! मुंबई, पुण्यासह ‘या’ 14 Railway Station वर आता तिकीट मिळणार नाही, कारण….

03:47 PM Dec 29, 2024 IST | Krushi Marathi
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी   मुंबई  पुण्यासह ‘या’ 14 railway station वर आता तिकीट मिळणार नाही  कारण…
Maharashtra Railway News
Advertisement

Maharashtra Railway News : तुम्हीही रेल्वेने प्रवास करताना मग आजची बातमी तुमच्या कामाची ठरणार आहे. खरंतर रेल्वेचा प्रवास हा खिशाला परवडणारा असल्याने अनेक जण रेल्वेने प्रवास करतात. रेल्वेचे नेटवर्क देखील देशातील कानाकोपऱ्यात विस्तारलेले आहे आणि यामुळे प्रवासासाठी रेल्वेला अधिक पसंती दाखवली जाते. दरम्यान राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Advertisement

ती म्हणजे महाराष्ट्रातील जवळपास 14 रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा मोठा निर्णय रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतलेला असून मध्य रेल्वेच्या 14 महत्त्वाच्या स्थानकांवर आता काही दिवस प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद राहणार आहे.

Advertisement

२९ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ मध्यरात्री १२ वाजेपर्यंत तात्पुरते निर्बंध घालण्यात आले आहेत. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 31 डिसेंबर सेलिब्रेट करण्यासाठी अनेक जण पिकनिकचा प्लॅन बनवतात. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक पर्यटन स्थळांकडे निघतात.

Advertisement

कोकण मुंबई गोव्यात नववर्षाच्या सेलिब्रेशन साठी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या फारच अधिक आहे. इतरही पिकनिक स्पॉटवर नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळते. मात्र, यामुळे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. दरम्यान येत्या दोन दिवसांवर 31 डिसेंबर आहे आणि यामुळे राज्यातील अनेक महत्त्वांच्या स्थानकावर आत्तापासूनच गर्दी होऊ लागली आहे.

Advertisement

या अतिरिक्त गरजेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वे मार्गावर असणाऱ्या महत्वाच्या स्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी नियंत्रणात राहावी यासाठी हे निर्बंध लावण्यात आले आहेत.

Advertisement

मध्य रेल्वे प्रशासनाने हे निर्बंध वर्षाच्या अखेरीस काही अनुचित घडू नये म्हणून आणि सुट्टी आणि वर्ष अखेरीस जमणारी गर्दी टाळण्यासाठी घेतले आहेत. ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, लहान मुले, निरक्षर व्यक्ती आणि महिला प्रवासी ज्यांना एकट्याने प्रवास करता येत नाही, अशा व्यक्तींचा प्रवास सुलभ व्हावा या हेतूनं निर्बंधांमधून सूट देण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण, पनवेल, पुणे, नागपूर, नाशिक रोड, भुसावळ, अकोला, सोलापूर, कलबुरगी आणि लातूर या स्थानकावर 2 जानेवारी 2025 पर्यंत प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद राहणार आहे.

Tags :