For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, लवकरच गर्दी पासून सुटका होणार, 31 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातुन धावणार 'ही' नवीन एक्सप्रेस ट्रेन, कसा असणार रूट?

09:42 AM Oct 29, 2024 IST | Krushi Marathi
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी  लवकरच गर्दी पासून सुटका होणार  31 ऑक्टोबरपासून महाराष्ट्रातुन धावणार  ही  नवीन एक्सप्रेस ट्रेन  कसा असणार रूट
Maharashtra Railway News
Advertisement

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी आत्ताच्या घडीची एक मोठी बातमी समोर येत आहे. दिवाळीतील गर्दी कमी करण्यासाठी अन छटपूजेसाठी गावी जाणार्‍या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासन वेगवेगळ्या मार्गांवर काही विशेष एक्सप्रेस गाड्या चालवत आहे.

Advertisement

आपल्या महाराष्ट्रातून देखील रेल्वे प्रशासनाने अनेक विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. दरम्यान, ३१ ऑक्टोबरपासून रेल्वे प्रशासन सनतनगर-रायपूर- सनतनगर ही दिवाळी स्पेशल ट्रेन चालवणार असल्याची बातमी हाती आली आहे.

Advertisement

ही ट्रेन नागपूर मार्गे चालवली जाणार आहे. दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार ? या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Advertisement

कसं राहणार विशेष एक्सप्रेस ट्रेनचे वेळापत्रक?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक ३१ ऑक्टोबर, ७ नोव्हेंबर आणि १४ नोव्हेंबरला ही विशेष एक्सप्रेस ट्रेन सनतनगर येथून रात्री ९ वाजता आपल्या गंतव्यस्थानाकडे रवाना होणार आहे. ही ट्रेन दुसर्‍या दिवशी सकाळी ८.२० वाजता नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचणार आहे

Advertisement

मग येथून पुढे निघाल्यानंतर सकाळी १०.२५ वाजता गोंदिया, ११.८ वाजता राजनांदगाव, १२.३० वाजता दुर्ग आणि दुपारी १.४५ वाजता रायपूरला पोहोचणार आहे.

Advertisement

तसेच परतीच्या प्रवासात ही गाडी दिनांक १ नोव्हेंबर ८ नोव्हेंबर तसेच १५ नोव्हेंबरला रायपूर रेल्वे स्थानकावरून सायंकाळी ४.४५ वाजता रवाना होणार आहे.

मग, राजनांदगावला सायंकाळी ६ वाजता, ७.३७ वाजता गोंदिया आणि रात्री ९.३५ वाजता नागपूरला पोहोचणार आहे. येथून दुसर्‍या दिवशी सकाळी ७.३५ वाजता सिकंदराबाद आणि सकाळी ९.३० वाजता सनतनगरला पोहोचणार आहे.

या ट्रेनमुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळणार अशी आशा आहे. खरे तर सध्या दिवाळीच्या गर्दीमुळे रेल्वे तिकीट मिळणे अशक्य होत आहे.

अशा परिस्थितीत ही गाडी सुरू झाली असल्याने विदर्भासहित या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मोठा फायदा होईल अशी आशा आहे.

Tags :