For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज : दिवाळीसाठी धावणार विशेष एक्सप्रेस ट्रेन! 'या' 16 रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

09:23 PM Oct 23, 2024 IST | Krushi Marathi
महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज   दिवाळीसाठी धावणार विशेष एक्सप्रेस ट्रेन   या  16 रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
Maharashtra Railway News
Advertisement

Maharashtra Railway News : राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गांवर अतिरिक्त गाड्या चालवल्या जात आहेत. दरवर्षी रेल्वे प्रशासन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर विशेष गाड्या चालवत असते.

Advertisement

यंदाही रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून आगामी दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. दिवाळी सणाला होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने अतिरिक्त विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय नुकताच घेतला आहे.

Advertisement

कानपूर सेंट्रल ते मदुरै दरम्यानही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार आहे. या विशेष Madurai Special Express च्या १६ फेर्‍या होतील. २७ नोव्हेंबर पर्यंत ही गाडी रेल्वे प्रशासनाकडून चालवली जाणार आहे आहे.

Advertisement

महत्त्वाचे म्हणजे या गाडीला प्रवाशांनी जर चांगला प्रतिसाद दाखवला तर ही गाडी यापुढेही अशीच सुरू ठेवली जाऊ शकते. ही गाडी आपल्या महाराष्ट्रातून धावणार आहे यामुळे राज्यातील रेल्वे प्रवाशांना देखील या गाडीचा मोठा लाभ मिळेल अशी आशा आहे.

Advertisement

दिवाळीच्या काळात या मार्गावर नेहमीच प्रवाशांची मोठी गर्दी होत असते. यंदाही दिवाळीला या मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असून हीच अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून ही विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याची घोषणा नुकत्याच काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे.

Advertisement

या गाडीच्या संरचनेबाबत बोलायचं झालं तर यात १ द्वितीय श्रेणी वातानुकूलित, ३ तृतीय श्रेणी वातानुकूलित, ७ शयनयान, ८ जनरल, गार्ड ब्रेक वॅन असे एकूण २१ कोच देण्यात आले आहे.

दरम्यान, प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे. या गाडीच्या थांब्याबाबत बोलायचं झालं तर ही गाडी या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.

नागपूर, चंद्रपूर, बलरशाह, शिरपूर कागझनगर, बेलमपल्ली, मंचिर्याल, रामगुंडम, खम्मम, विजयवाडा, नेल्लोर, गुडूर रेनिगुंता, काटपाडी, जालारपेट्टई, सालेम ईरोड तीरुप्पूर, पोदनूर , किणाटटुक्कडवू इत्यादी रेल्वे स्थानकावर या गाडीला थांबा मंजूर झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

Tags :