For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

कोकण रेल्वेचा मोठा निर्णय ! सुरू करणार विशेष एक्सप्रेस ट्रेन, महाराष्ट्रातील ‘या’ 14 रेल्वे स्थानकावर थांबा घेणार

01:52 PM Dec 09, 2024 IST | Krushi Marathi
कोकण रेल्वेचा मोठा निर्णय   सुरू करणार विशेष एक्सप्रेस ट्रेन  महाराष्ट्रातील ‘या’ 14 रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
Maharashtra Railway News
Advertisement

Maharashtra Railway News : तुळशी विवाह झाला की महाराष्ट्रात लग्नसराईचा सीझन सुरू होतो. त्यानुसार राज्यात आता लग्नसराईचा सिझन सुरू झाला असून अनेक जोडपी लग्न बंधनात अडकली सुद्धा आहेत. दरम्यान लग्नसराई, नाताळ आणि नववर्षाच्या निमित्ताने कोकण रेल्वे कडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

Advertisement

लग्नसराई, नाताळ आणि नववर्ष सेलिब्रेट करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेकजण कोकणात फिरायला जातात. दरम्यान, कोकणात जाणाऱ्या लोकांसाठी रेल्वेने एक मोठा निर्णय घेतलाय.

Advertisement

कोकण रेल्वे मार्गावर एक नवीन विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवली जाणार असून ही गाडी अहमदाबाद ते थिवी दरम्यान धावणार आहे. ही एक द्विसाप्ताहिक विशेष गाडी राहणार असून या गाडीचा कोकणात जाणाऱ्या लोकांना मोठा फायदा होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

Advertisement

दरम्यान आता आपण या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भातही आता आपण माहिती पाहणार आहोत.

Advertisement

कसे राहणार विशेष एक्सप्रेस ट्रेन चे वेळापत्रक?

Advertisement

अहमदाबाद-थिवि ही विशेष द्विसाप्ताहिक रेल्वेगाडी 8 डिसेंबर 2024 पासून चालवली जात आहे. ही गाडी 8 डिसेंबर ते 1 जानेवारी 2025 या काळात चालवली जाईल. कोकण रेल्वे मार्गांवर चालवल्या जाणाऱ्या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

कोणत्या स्थानकावर थांबणार विशेष गाडी

कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या द्विसाप्ताहिक रेल्वेगाडीला आणंद, वडोदरा, भरुच, उधना जंक्शन, वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळुण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या रेल्वे स्थानकाकर थांबा मंजूर करण्यात आला आहे.

नक्कीच कोकणातील बहुतांशी रेल्वे स्थानकावर या एक्सप्रेस ट्रेन ला थांबा मंजूर करण्यात आला असल्याने कोकणात नाताळ तसेच नववर्षाच्या सुट्ट्या सेलिब्रेट करायला जाणाऱ्या पब्लिकला या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.

Tags :