अखेर निर्णय झालाच ! पुण्यातून धावणाऱ्या ‘या’ वंदे भारत एक्सप्रेसला आणखी एक थांबा मंजूर ! कोणत्या Railway Station वर थांबणार ?
Maharashtra Railway News : महाराष्ट्रात सध्या अकरा वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू असून पुण्यातून तीन गाड्या सुरू आहेत. दरम्यान पुण्यातून धावणाऱ्या तीन पैकी एक वंदे भारत ट्रेन संदर्भात नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे ते हुबळी दरम्यान सुरू असणाऱ्या गाडीला एक नवीन थांबा मंजूर करण्यात आला आहे.
सध्या पुणे ते कोल्हापूर पुणे ते हुबळी आणि मुंबई सेंट्रल-पुणे-सोलापूर यातील वंदे भारत ट्रेन पुण्यातून धावत आहेत. दरम्यान यातील पुणे-हुबळी वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्रालयाने कर्नाटकातील बेळगावी येथील घटप्रभा रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्स्प्रेसचा थांबा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
खासदार इराणा काडादी यांनी घटप्रभा रेल्वे स्थानकावर थांबा उभारण्यासाठी रेल्वे मंत्रालयाला विनंती केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 28 नोव्हेंबर 2024 च्या पत्रानुसार, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही विनंती मान्य केली आणि मंजूर केली.
पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड, मिरज, बेळगावी, धारवाड या प्रदेशातील प्रमुख शहरांना जोडणारी वंदे भारत एक्स्प्रेस गाडी आता घटप्रभाला जाणाऱ्या प्रवाशांना सोयीस्कर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
भारतीय रेल्वेने घटप्रभा रेल्वे स्थानकावर वंदे भारत एक्सप्रेससाठी प्रायोगिक थांबा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चाचणी आधारावर थांबा जोडला जाईल, आणि त्याची स्थायीता स्थानकावरील तिकीट विक्रीद्वारे निश्चित होणार आहे.
प्रवाशांना आधुनिक आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यासाठी या ट्रेनची रचना करण्यात आली आहे. पुणे ते हुबळी दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आता घटप्रभा रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे.
ही ट्रेन धारवाड, बेळगावी, मिरज, सांगली, सातारा, आणि कराड या रेल्वे स्टेशन सोबतच आता घटप्रभा रेल्वे स्टेशनवर देखील थांबणार आहे. यामुळे घटप्रभा येथून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. घटप्रभा कडून पुण्याला आणि घटप्रभाच्या पुढे हुबळीकडे प्रवास करणाऱ्यांना या गाडीचा मोठा फायदा होणार आहे.