कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! उत्तर महाराष्ट्रातुन सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, कोण-कोणत्या रेल्वे स्टेशनवर थांबणार ?

10:18 AM Dec 22, 2024 IST | Krushi Marathi
Maharashtra Railway News

Maharashtra Railway News : उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर, येत्या काही दिवसांनी नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण कोकणात पिकनिकचा प्लॅन बनवतात. काहीजण गोव्याला देखील जातात.

Advertisement

याशिवाय दुसऱ्या शहरांमध्ये कामानिमित्त तसेच शिक्षणानिमित्त वास्तव्याला असणारे नववर्षाला आपल्या घरी जातात. यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये दरवर्षी या काळात मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.

Advertisement

दरम्यान हीच संभाव्य गर्दी लक्षात घेता रेल्वेच्या माध्यमातून नुकताच एक निर्णय घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या माध्यमातून नाशिक ते धनबाद ही विशेष गाडी चालवली जाणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांना या गाडीचा नक्कीच मोठा दिलासा मिळणार आहे.

अशा परिस्थितीत आज आपण नाशिक ते धनबाद दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन चे संपूर्ण वेळापत्रक तसेच ही गाडी कुठे कुठे थांबा घेणार या संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

Advertisement

कस राहणार वेळापत्रक?

Advertisement

सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिक ते धनबाद विशेष ट्रेन (गाडी क्रमांक 03398) 22 डिसेंबर 2025 ते 02 जानेवारी 2025 दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी प्रत्येक गुरुवार आणि रविवारी नाशिक येथून सकळी 8 वाजून 55 मिनिटांनी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी धनबाद येथे रात्री 09 वाजता पोहचणार आहे.

तसेच धनबाद ते नाशिक विशेष ट्रेन ( गाडी क्रमांक 03397 गरीबरथ) ही गाडी 20 डिसेंबर 2025 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान चालवली जाणार आहे. या काळात ही गाडी प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार रोजी धनबाद येथून रात्री 11 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी नाशिक येथे सकाळी 07 वाजता पोहचणार आहे.

कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार ?

उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आलेला आहे.

ही गाडी या मार्गावरील मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबळपूर, न्यू कटनी, सिंगरुळी, चोपण, रेनूकूट, गरवा रोड, डाल्टनगंज, बरवाडीह, लतेहार, टोरी, खलारी, पत्रातू, बरका काना, रांची रोड, गुमीया, बोकारो, चंद्रपूरा, कत्रासगढ या महत्त्वाच्या रेल्वे स्टेशनवर थांबणार अशी माहिती सेंट्रल रेल्वेने दिलेली आहे.

Tags :
maharashtra railway news
Next Article