महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! सुरू होणार नवीन एक्सप्रेस ट्रेन, 'या' 12 Railway Station वर थांबणार
Maharashtra Railway News : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. दिवाळीनिमित्त २ अतिरिक्त सेवांसह लोकमान्य टिळक टर्मिनस बिलासपुर -लोकमान्य टिळक टर्मिनस उत्सव विशेष
ट्रेनला मुदतवाढ देण्यात मोठा निर्णय सेंट्रल रेल्वेने घेतला असून यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त होत आहे. खरं तर या मार्गावर दरवर्षी दिवाळीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असते.
यंदाही या मार्गावर प्रवाशांची संख्या वाढण्याची शक्यता असून याच पार्श्वभूमीवर या मार्गावर विशेष एक्सप्रेस ट्रेन चालवण्याचा निर्णय गेल्या काही दिवसांपूर्वी घेतला गेला. दरम्यान आता या विशेष एक्सप्रेस ट्रेन ला मुदतवाढ देण्याचा निर्णय झालेला आहे.
यामुळे एलटीटी ते बिलासपूर दरम्यान प्रवास करणाऱ्यांना नक्कीच या निर्णयाचा फायदा होणार आहे. ही उत्सव विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून बुधवार, ३० ऑक्टोबरला रात्री ११.५० वाजता सोडली जाणार आहे आणि बिलासपूर येथे
दुसऱ्या दिवशी रात्री ८.५० वाजता पोहोचणार अशी माहिती सेंट्रल रेल्वे कडून समोर आली आहे. तसेच बिलासपूर येथून ही गाडी मंगळवारी सकाळी ९.३५ वाजता सोडण्यात आली होती आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजता पोहोचली.
ही विशेष एक्सप्रेस ट्रेन कोण कोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार
सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही विशेष गाडी या मार्गावरील बारा महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे यापैकी दहा थांबे हे आपल्या महाराष्ट्रातीलच आहेत. अर्थातच महाराष्ट्रातील 10 रेल्वे स्टेशनवर ही गाडी थांबणार आहे.
या मार्गावरील कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, गोंदिया, दुर्ग आणि रायपूर या स्थानकावर या विशेष गाडीला थांबा मंजूर करण्यात आला असल्याची माहिती सेंट्रल रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे.