महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर ! 'या' मार्गावर सुरू झाली नवीन रेल्वे गाडी, राज्यातील 'या' 14 स्थानकावर थांबणार, कसं राहणार नवीन वेळापत्रक ?
Maharashtra Railway News : महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी दीपोत्सवाच्या काळात एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्यातील रेप्रवाशांसाठी प्रशासनाने नवीन रेल्वे गाडी सुरू केली आहे. खरंतर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या मार्गांवर रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत.
दौंड ते कलबुर्गी दरम्यान नवीन रेल्वे गाडी सुरू व्हावी अशीही मागणी प्रवाशांकडून केली जात होती. यासाठी प्रवाशांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू होता.
दरम्यान प्रवाशांचा हा पाठपुरावा ऐन दिवाळीच्या काळात पूर्ण झाला असून प्रशासनाने दौंड ते कलबुर्गी या मार्गावर नवीन रेल्वेगाडी सुरु केली आहे.
येथील प्रवाशांकडून या गाडीसाठी वारंवार मागणी केली जात होती. या मार्गावर ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर ही रेल्वे गाडी सुरू झाल्याने प्रवाशातूनही मोठा आनंद व्यक्त होत आहे.
याअशा परिस्थितीत आज आपण रेल्वे प्रशासन आणि सुरू केलेल्या दौंड ते कलबुर्गी दरम्यानच्या या नव्या रेल्वे गाडीचे संपूर्ण वेळापत्रक आणि ही गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दौंड कलबुर्गी नव्या रेल्वे गाडीचे वेळापत्रक कसे राहणार?
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार ही नवीन रेल्वे गाडी दौंड येथून पहाटे 5 वाजता निघणार आहे आणि कलबुर्गी रेल्वे स्थानकावर अकरा वाजता पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात ही गाडी 4:10 वाजता कलबुर्गी येथून निघून कुर्डूवाडीत 7:47 मी येऊन दौंड येथे रात्री 10:22 मिनिटाला पोहोचणार आहे.
ही नवीन रेल्वे गाडी कोणकोणत्या रेल्वे स्थानकावर थांबा घेणार?
दौंड कलबुर्गी नव्या रेल्वे गाडीला या मार्गावरील अनेक महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर थांबा मंजूर करण्यात आला आहे. भिगवण, पारेवाडी, जेऊर, केम, कुईवाडी, माढा, मोहोळ सोलापूर, टिकेकरवाडी, दुधनी, होटगी, अक्कलकोट रोड, बोरोटी, गाणगापूर रोड या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर ही नवी रेल्वे गाडी थांबा घेणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.