धक्कादायक ! महाराष्ट्रात जमीन-खरेदी विक्रीच्या व्यवहारात गैरप्रकार, व्यवहार करताना काय काळजी घ्यावी ?
Maharashtra Land Sell-Buy Scam : महाराष्ट्रासह संबंध भारतात अलीकडील काही वर्षांमध्ये स्थावर मालमत्तेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात आहे. अनेक जण प्लॉट आणि जमिनीतही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत.
विशेषता कोरोना काळापासून जमिनीत गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पण एकीकडे जमिनीत गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढत असतानाच जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात देखील मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याची बाब उघडकीस आली आहे.
अनेकजण घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करतात, काहीजण शेतीसाठी जमीन खरेदी करतात तर काहीजण गुंतवणूक म्हणून जमिनीची खरेदी करतात. पण जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात होणारा घोटाळा पाहता अनेकांना मोठे भुर्दंड सहन करावे लागले आहे.
जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात गैरप्रकार होतोय हे निश्चित आहे, पण गैरप्रकार होत असल्याने जमीन खरेदी करणेच टाळावे का? तर नाही. मात्र जमीन खरेदी करताना लोकांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे.
दरम्यान जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारांमध्ये होणारी फसवणूक कशी टाळावी? याच बाबीचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत.
जमीन खरेदी विक्री करताना या गोष्टींची काळजी घ्या
अनेक प्रकरणांमध्ये जमीन विक्री करणारे लोक ॲडव्हान्स एका व्यक्तीकडून घेतात आणि जमीन दुसऱ्याच व्यक्तीला विकत असतात. यामुळे ॲडव्हान्स देताना विशेष सावधानता बाळगणे आवश्यक आहे. खरे तर आपल्याकडे कोणतीही गोष्ट खरेदी करताना खरेदीदार ऍडव्हान्स देत असतो. जमीन खरेदीच्या व्यवहारात देखील हीच प्रथा पाळली जाते. ॲडव्हान्स घेतला म्हणजे विक्री करणारा ज्याने ऍडव्हान्स दिला आहे त्याला जमीन देणार असे मानले जाते. पण काही लोक यामध्ये फसवणूक करतात. ॲडव्हान्स एकाकडून घेतला जातो अन जमीन दुसऱ्याला दिली जाते. म्हणून लोकांनी जमीन खरेदीच्या वेळी या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
अनेकदा जमीन खरेदीच्या व्यवहारांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर करून फसवणूक केली जाते. यामुळे जर तुम्हीही जमीन खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर जमीन खरेदी करण्यापूर्वी त्या मालमत्तेची सर्व कागदपत्रे यथायोग्य आहेत की नाही याची खातरजमा करणे आवश्यक राहणार आहे. विशेषतः जमिनीच्या मालकीची संपूर्ण कागदपत्रे काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. जर तुम्हाला कागदपत्रांबाबत काहीही शंका असेल तर तुम्ही तज्ञांचा सल्ला घ्यायला हवा.
मंडळी जमीन खरेदी करतांना खरेदी खत तयार केले जात असते. भूमी अभिलेख विभागात जमीन खरेदीची नोंद लागते आणि खरेदीखत तयार होते. शिवाय सातबारा उताऱ्यावर देखील याची नोंद लागत असते. मात्र ही थोडीशी वेळ खाऊ प्रक्रिया असते. म्हणून जमिनीचा मुळ मालक दुसऱ्या ग्राहकाला खरेदी खत वापरुन जमीन विकू शकतो. म्हणजे एकच जमीन एकापेक्षा अधिक लोकांना विकली जाते आणि खरेदीदारांची फसवणूक होण्याची शक्यता असते.
आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जर जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात फसवणूक झाली असेल तर काय करावे. जर तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जाऊन संबंधित व्यवहाराची तक्रार करू शकता. एवढेच नाही तर पोलीस स्टेशनमध्येही याबाबत तक्रार दिली जाऊ शकते. तुम्ही तक्रार दाखल केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुमच्या व्यवहाराची चौकशी केली जाते आणि मग चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या लोकांवर कारवाई होते.