कृषी बातम्यासरकारी योजनाबाजारभावयशोगाथाहवामानस्पेशल स्टोरी
Advertisement

पाऊस अजून गेलेला नाही, तो पुन्हा येतोय ; महाराष्ट्रात इतके दिवस पाऊस सुरु राहणार ! हवामान खात्याचा अंदाज

09:18 PM Oct 31, 2024 IST | Krushi Marathi
Maharashtra Havaman Andaj

Maharashtra Havaman Andaj : भारतीय हवामान खात्याने यंदा संपूर्ण दिवाळी मध्ये पाऊस सुरू राहणार असा अंदाज दिला आहे. खरे तर, मान्सून परतल्यानंतर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मानसूनोत्तर पावसाने दणका दिला. मानसूनोत्तर पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Advertisement

अगदी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले शेती पिक अवकाळी पावसामुळे वाया गेले आणि शेतकऱ्यांनी केलेला हजारो रुपयांचा खर्च पाण्यात गेला.

Advertisement

यामुळे रब्बी हंगामातील पीक पेरणीची कामे देखील खोळंबलीत. दरम्यान आता भारतीय हवामान खात्याने आगामी काही दिवस महाराष्ट्रात पाऊस सुरू राहणार असे म्हटले आहे.

सध्या राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ-उतार सुरू असून आगामी काही दिवस कमाल आणि किमान तापमानात असाच चढ-उतार पाहायला मिळू शकतो आणि तीन नोव्हेंबर पर्यंत राज्यात पाऊस सुरू राहू शकतो असा अंदाज हवामान खात्याच्या तज्ञांनी यावेळी दिला आहे.

Advertisement

तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र (विशेषत: घाटमाथा), मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी आगामी काही दिवस पावसाची शक्‍यता आहे.

Advertisement

या भागात 3 नोव्हेंबरपर्यंत वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा हा अंदाज लक्षात घेऊनच आपल्या शेतीकामांचे नियोजन आखावे असा सल्ला कृषी क्षेत्रातील जाणकारांनी दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण-पूर्व बंगालचा उपसागर ते दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीपर्यंत चक्रीय स्थिती कार्यरत आहे.

त्यामुळे या भागाकडून राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. याचाच परिणाम म्हणून सध्या महाराष्ट्रात पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात चढ उतार होत असून 3 नोव्हेंबर पर्यंत राज्यात असेच हवामान पाहायला मिळू शकते.

विशेष बाब अशी की पाऊस कमी झाल्यानंतर राज्यात थंडीची तीव्रता वाढणार आहे. ३ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होऊ शकते असे मत जाणकार लोकांकडून व्यक्त होत आहे.

Tags :
Maharashtra Havaman Andaj
Next Article