For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज ! रब्बी हंगामातही सुरु राहणार एक रुपयात पिक विमा योजना, 'या' तारखेपर्यंत अर्ज करता येईल

04:05 PM Oct 30, 2024 IST | Krushi Marathi
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज   रब्बी हंगामातही सुरु राहणार एक रुपयात पिक विमा योजना   या  तारखेपर्यंत अर्ज करता येईल
Maharashtra Farmer Scheme
Advertisement

Maharashtra Farmer Scheme : गेल्यावर्षी अर्थातच 2023 मध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला होता. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना शिंदे सरकारने केवळ एक रुपयात पिक विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलाय.

Advertisement

दरम्यान आता या आगामी रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. खरे तर नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

Advertisement

हेच नुकसान कमी करण्याच्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा उतरवला जातो. आधी शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा उतरवण्यासाठी शेतकऱ्यांना एक निश्चित रक्कम भरावी लागत होती. पण गेल्या वर्षीपासून शेतकऱ्यांना फक्त एक रुपयात पिक विमा उपलब्ध होत आहे.

Advertisement

यंदाच्या रब्बी हंगामात देखील शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा उपलब्ध होणार असून एक नोव्हेंबर 2024 पासून रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा व ज्वारी पिकाचा विमा काढता येणार असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Advertisement

दरम्यान आता आपण एक रुपयात पिक विमा योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची दिनांक काय आहे याबाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.

Advertisement

एक रुपयात पिक विमा योजनेची शेवटची तारीख

या चालू रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा आणि कांदा या पिकाचा विमा एक रुपयात काढता येणार आहे. तसेच उन्हाळी भात आणि भुईमूग साठीही एक रुपयात पिक विमा योजना उपलब्ध आहे.

यात सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या पोर्टल वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. केंद्र सरकारच्या www.pmfby.gov.in या पोर्टल वर जाऊन शेतकऱ्यांना एक रुपयात पिक विमा योजनेसाठी अर्ज करता येईल.

दरम्यान सोलापूरमधील गहू, हरभरा, ज्वारी पिकासाठी सहभाग घेण्याची तारीख 15 डिसेंबर 2024 तर उन्हाळी भुईमूग आणि भात यासाठी शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या या पिकाचा विमा उतरून जास्तीत जास्त सहभाग घ्यावा, असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून केले जात आहे.

Tags :