For the best experience, open
https://m.krushimarathi.com
on your mobile browser.

सर्वसामान्यांसाठी धक्कादायक बातमी, ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती भडकल्यात, किती रुपयांनी वाढलेत दर? पहा....

07:45 AM Nov 01, 2024 IST | Krushi Marathi
सर्वसामान्यांसाठी धक्कादायक बातमी  ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती भडकल्यात  किती रुपयांनी वाढलेत दर  पहा
LPG Gas Cylinder Price
Advertisement

LPG Gas Cylinder Price : सध्या दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सबंध देशात आनंदाचे वातावरण आहे. दीपोत्सवाचा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा होत आहे. मात्र याच दिवाळीच्या काळात सर्वसामान्यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.

Advertisement

वाढत्या महागाईने बेजार झालेल्या नागरिकांना दिवाळीत आणखी एक मोठा धक्का बसला आहे. खरे तर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलेंडरचे दर सुधारित केले जात असतात.

Advertisement

नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या तारखेला देखील एलपीजी गॅस सिलेंडरचे दर सुधारित झाले असून व्यावसायिक गॅस सिलेंडर आज पासून महागले आहे. यामुळे दिवाळीच्या काळात सर्वसामान्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

Advertisement

व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग झाले असल्याने याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत नाही मात्र अप्रत्यक्षरीत्या याचा भार हा सर्वसामान्य जनतेवरच पडतो.

Advertisement

व्यावसायिक गॅस सिलेंडर महाग झाल्याने विविध खाद्यपदार्थांच्या किमती वाढण्याची शक्यता असते. यामुळे याचा अप्रत्यक्षरीत्या भार हा सर्वसामान्य जनतेवरच पडतो.

Advertisement

किती वाढल्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती
व्यवसाय गॅस सिलेंडरच्या किमती अर्थातच 19 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमती 01 नोव्हेंबर 2024 पासून वाढल्या आहेत. 19 किलो वजनी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत 62 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

नवीन रेट नुसार आता राजधानी मुंबईतील व्यावसायिक एलपीजी सिलिंडर वापरकर्त्यांना आता गॅस खरेदीसाठी वाढीव ६२ रुपये मोजावे लागणार आहे. आधी मुंबईमध्ये निळा कलरचा व्यावसायिक सिलिंडर १६९२.५० रुपये उपलब्ध होत होता

पण आता हा सिलेंडर १७५४.५० रुपयांना मिळणार आहे. तसेच, कोलकात्यात व्यावसायिक सिलेंडर हा १८५०.५० रुपये होता आता तो १९११.५० रुपयांना मिळणार आहे. चेन्नईत १९०३ रुपयांना मिळणारा निळा सिलिंडर आता १९६४.५० रुपयांना मिळणार आहे.

मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत अर्थातच 14.2 किलो वजनी गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणताच बदल झालेला नाही. आजही राजधानी मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडर ८०२.५० रुपयांना उपलब्ध आहे.

Tags :