Land Purchase Rules: तुम्ही ‘या’ राज्यांमध्ये राहू शकता, पण जमीन खरेदी शक्य नाही! वाचा धक्कादायक कारणे
General Knowledge:- भारतात अनेक लोक शहरांपेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचे स्वप्न पाहतात आणि डोंगराळ भागात किंवा हिरव्यागार ठिकाणी जमीन खरेदी करून आपले हक्काचे घर बांधू इच्छितात. मात्र, देशातील काही राज्यांमध्ये बाहेरील व्यक्तींना जमीन खरेदी करण्यावर बंधने आहेत. हे निर्बंध त्या राज्यांच्या विशेष संवैधानिक तरतुदींमुळे लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्ही जमीन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या सात राज्यांमध्ये तुम्हाला काय अडचणी येऊ शकतात, याबाबत माहिती असणे आवश्यक आहे.
या सात राज्यांमध्ये बाहेरच्या व्यक्तींना जमीन खरेदी करता येत नाही
हिमाचल प्रदेश
हे निसर्गप्रेमींसाठी एक आवडते ठिकाण आहे. मात्र, येथे बाहेरील लोकांना शेतीसाठी जमीन खरेदी करण्याची परवानगी नाही. १९७२ च्या हिमाचल प्रदेश जमीन सुधारणा आणि भाडेकरू कायद्याच्या कलम ११८ नुसार, बिगरशेती करणाऱ्या व्यक्तींना येथे जमीन घेता येत नाही. त्यामुळे जर तुम्ही हिमाचलमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर यासाठी तुम्हाला सरकारची परवानगी घ्यावी लागेल किंवा इतर कायदेशीर पर्याय शोधावे लागतील.
नागालँड
नागालँडमध्ये देखील बाहेरील लोकांना जमीन खरेदी करता येणार नाही. भारतीय संविधानाच्या कलम ३७१अ अंतर्गत नागालँडला विशेष अधिकार देण्यात आले आहेत, ज्यामुळे स्थानिक लोकांचे सांस्कृतिक आणि जमिनीचे हक्क सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे येथे केवळ स्थानिक रहिवासीच जमीन विकत घेऊ शकतात.
सिक्कीम
याचप्रमाणे सिक्कीम राज्यातही बाहेरील लोकांसाठी जमिनीच्या खरेदी-विक्रीवर कठोर निर्बंध आहेत. भारतीय संविधानाच्या कलम ३७१AF अंतर्गत फक्त सिक्कीमचे स्थानिक नागरिकच येथे जमीन खरेदी करू शकतात.
अरुणाचल प्रदेश
हे देशातील एक निसर्गरम्य राज्य आहे आणि दरवर्षी येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. मात्र, बाहेरील व्यक्तींना येथे जमीन खरेदी करायची असल्यास सरकारची परवानगी घ्यावी लागते. शेतीसाठीची जमीन विकत घेण्यासाठी कठोर नियम आहेत, त्यामुळे येथे गुंतवणूक करण्यापूर्वी संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे गरजेचे आहे. मिझोरममध्येही भारतीय संविधानाच्या कलम ३७१G अंतर्गत मालमत्तेच्या खरेदी-विक्रीवर निर्बंध आहेत. येथे स्थानिक आदिवासी लोकांनाच जमीन खरेदी आणि मालकी हक्क मिळतो.
आसाम
आसाममध्येही बाहेरील लोकांना जमीन खरेदी करता येणार नाही. कलम ३७१ ब अंतर्गत येथील आदिवासी आणि स्थानिक रहिवाशांचे हक्क सुरक्षित ठेवले जातात. त्यामुळे जर तुम्ही आसाममध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर यासाठी तुम्हाला सरकारी परवानग्या आवश्यक असतील.
मणिपूर
मणिपूर हे आणखी एक राज्य आहे जिथे बाहेरील लोकांना जमीन खरेदी करण्यास बंदी आहे. येथे फक्त स्थानिक नागरिकच जमीन विकत घेऊ शकतात आणि त्यावर हक्क सांगू शकतात.
मेघालय
मेघालय हे देखील एक निसर्गरम्य राज्य असून, येथे पर्यटनासाठी मोठ्या प्रमाणावर लोक येतात. मात्र, भारतीय संविधानातील विशेष तरतुदींनुसार बाहेरील व्यक्तींना येथे जमीन खरेदी करण्यास परवानगी नाही. त्यामुळे जर तुम्ही या राज्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला स्थानिक कायद्यांची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
वरील राज्यांव्यतिरिक्त, भारतातील इतर राज्यांमध्ये बाहेरच्या नागरिकांना जमीन खरेदी करण्यावर कोणतेही बंधन नाही. त्यामुळे जर तुम्हाला घर बांधायचे असेल किंवा जमिनीवर गुंतवणूक करायची असेल, तर इतर राज्यांमध्ये हे सहज शक्य आहे. मात्र, तुम्ही हिमाचल प्रदेश, सिक्कीम किंवा ईशान्य भारतातील राज्यांमध्ये जमीन खरेदी करायचा विचार करत असाल, तर तुम्हाला स्थानिक कायद्यांनुसार परवानग्या घ्याव्या लागतील. अन्यथा, तुमचा जमीन व्यवहार रद्द केला जाऊ शकतो. त्यामुळे जमीन खरेदी करण्यापूर्वी संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे आणि योग्य सल्लागाराची मदत घेणे आवश्यक आहे.