गुलाबी बोंडअळीचा आता कायमचा बळी! पहिला स्वदेशी GM कापूस विकसित… केंद्र सरकारच्या पुढाकाराने मोठी क्रांती
Kapus News:- पिकांवरील रोगराई आणि हानिकारक किडी शेतकऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. कापसावर हिरवी बोण्डअळीचा त्रास तर आधीपासून होता, पण गेल्या काही वर्षांत गुलाबी बोण्डअळीने कापूस उत्पादनाला मोठा फटका बसवला. मात्र, आता केंद्र सरकारच्या पुढाकाराने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. लखनऊच्या नॅशनल बॉटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने (NBRI) जगातील पहिला जीएम (GM) कापूस वाण विकसित केल्याचा दावा केला आहे, जो गुलाबी बोण्डअळीला पूर्णतः प्रतिरोध करेल.
गुलाबी बोण्डअळीवर अखेरचा वार! GM कापूस शेतकऱ्यांसाठी गेम चेंजर?
या नवीन जीएम कापसामुळे भारत, आफ्रिका आणि आशियातील अनेक देशांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गुलाबी बोण्डअळीमुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. मात्र, संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. पी. के. सिंग आणि त्यांच्या टीमने एक अत्याधुनिक कीटकनाशक जनुक विकसित केले आहे, जे गुलाबी बोण्डअळीला नष्ट करण्यासोबतच पानांवरील कीड आणि आर्मीवॉर्म सारख्या इतर किडींपासूनही संरक्षण देणार आहे. हे स्वदेशी तंत्रज्ञान असल्याने शेतकऱ्यांना स्वस्त आणि प्रभावी उपाय मिळणार आहे.
GM कापूस बाजारात कधी येणार? नागपूरच्या "अंकुर सिड्स"ने घेतला पुढाकार!
संशोधनानंतर या बियाण्यांच्या उत्पादनाचा प्रश्न निर्माण झाला. नागपूरस्थित "अंकुर सिड्स" या नामांकित बियाणे कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे. नुकत्याच झालेल्या करारानुसार, या संस्थेने हे GM कापसाचे बियाणे विकसित करण्याचे तंत्रज्ञान स्वीकारले आहे. डॉ. अश्विन काशीकर, अंकुर सिड्सचे विकास महाव्यवस्थापक, यांनी सांगितले की गुलाबी बोण्डअळीच्या त्रासातून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी ही मोठी क्रांती ठरेल.
GM कापसामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा! उत्पन्न दुपटीने वाढण्याची शक्यता
विशेष म्हणजे, २००२ मध्ये अमेरिकन कंपनीच्या सहकार्याने भारतात GM कापूस आले होते, पण बोलगार्ड तंत्रज्ञान असलेल्या कापूस जातींना गुलाबी बोण्डअळीपासून पूर्ण संरक्षण मिळाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. मात्र, स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित झालेला हा नवीन GM कापूस पूर्णतः प्रतिकारशक्ती असलेला असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कीटकनाशकांवरील खर्च कमी होईल, उत्पादन वाढेल आणि उत्पन्न दुपटीने वाढण्याची शक्यता आहे.
कधी उपलब्ध होणार नवीन GM कापूस?
येत्या काही महिन्यांत GM कापसाच्या बियाण्यांच्या व्यावसायिक उत्पादनास मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. परवाना प्रक्रियेनंतर शेतकऱ्यांना २०२५ च्या खरीप हंगामात हे GM कापूस बियाणे उपलब्ध होईल. हा कापूस शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी ठरणार आहे, कारण त्याने कापसावरील हानिकारक किडींचा प्रभाव नष्ट होईल आणि उत्पादनात मोठी वाढ होईल.
शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! GM कापूस उत्पादनात भारत होणार जागतिक नेता?
लखनऊ येथील संशोधन संस्थेच्या या मोठ्या यशामुळे, भारत जगभरातील कापूस उत्पादक देशांमध्ये आघाडीवर येऊ शकतो. भारतीय शेतकऱ्यांना यामुळे मोठा फायदा होईल आणि निर्यातीतही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे GM कापसाचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.