कामिनी ताईंनी सरकारी नोकरी सोडून सुरू केली शेवगा शेती! शेवग्याच्या विविध उत्पादनातून वर्षाला आहे दीड कोटींची कमाई
Business Success Story:- सरकारी नोकरी मिळवणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व प्रत्येकजण शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आपल्याला दिसून येते. परंतु हातात चांगल्या पगाराची सरकारी नोकरी असताना ती सोडून शेती सारख्या व्यवसायात पडणे हे वाटते तितके सोपी गोष्ट नाही व हे अत्यंत धाडसयुक्त आणि जोखमीचे असे काम आहे.
परंतु आपण बऱ्याच शेतकऱ्यांच्या यशोगाथ वाचतो किंवा आपण असे काही शेतकरी किंवा व्यावसायिक पाहिले असतील की त्यांनी नोकऱ्या सोडल्या आणि व्यवसायांमध्ये किंवा शेतीमध्ये चांगल्या प्रकारचे यश मिळवले.
अगदी याच प्रकारे जर आपण डॉ. कामिनी सिंग यांचे उदाहरण घेतले तर त्यांनी देखील चांगल्या पगाराची सरकारी नोकरी सोडली व शेवगा शेती करण्याचा निर्णय घेऊन या शेवगा शेतीतून आज कोट्यावधींची उलाढाल ते वर्षाला करत आहे.
कामिनी सिंग लखनऊ येथे होत्या शास्त्रज्ञ
कामिनी सिंग या उच्चशिक्षित असून लखनऊ येथे शास्त्रज्ञ म्हणून ते काम करत होत्या. परंतु नोकरी करत असतानाच त्यांचा शेतीकडील ओढा वाढला व सात वर्ष नोकरी करून त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा द्यायचे ठरवले व राजीनामा दिला. त्यानंतर मात्र त्यांनी अगोदर शेवगा शेतीवर पूर्ण अभ्यास आणि त्या शेतीचे संशोधन केले.
अशा प्रकारे शेवगा शेतीवर काम सुरू असताना त्यांना एका कंपनीमध्ये नोकरी करण्याची संधी मिळाली व त्या कंपनीच्या संचालकपदी त्या रुजू झाल्या व महत्त्वाचे म्हणजे त्या जेव्हा या कंपनीत काम करत होत्या तेव्हा शेतकऱ्यांशी त्यांचा संपर्क वाढला.
या सगळ्या शेतीसंबंधीत घडामोडीतून त्यांनी 2017 मध्ये शेवगा लागवडीसाठी पायलट प्रोजेक्ट सुरू केला व शेवग्याच्या शेती करण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या रसायनांची गरज लागत नाही व कुठल्याही हंगामात शेवगा शेती करता येणे शक्य आहे. हे त्यांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी यामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून दिले.
तसेच शेवग्याच्या झाडाच्या आरोग्यविषयक गुणधर्मांवर अभ्यास करताना त्यांना दिसून आले की, शेवग्याच्या झाडाची पाने तसेच त्या झाडाची मुळे हे जीवनसत्व आणि उपयुक्त अशा खनिजांनी समृद्ध आहेत. शेवग्यामध्ये अँटिऑक्सिडंट, अँटी कॅन्सर आणि अँटि इम्प्लिमेंटरी इत्यादी घटक मोठ्या प्रमाणावर आहेत व त्यावर त्यांनी काम सुरू केले 2019 मध्ये कामिनी सिंग यांनी स्वतःची संस्था सुरू करण्याचा निर्णय घेतला व संस्था सुरू केली.
अशाप्रकारे काम करते कामिनी सिंग यांची संस्था
2019 मध्ये कामिनी सिंग यांनी सुरू केलेल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारचे शेवग्याचे उत्पादन जसे की, मोरिंगा पावडर, साबण, तेल, कॅप्सूल इत्यादी वस्तू बनवायला सुरुवात केली व या व्यवसायाच्या सुरुवातीला छोट्याशा पॅकिंगमध्ये शेवग्याची पावडर देखील त्यांनी विकायला सुरुवात केली.
त्यानंतरच्या कालावधीत या व्यवसायासाठी त्यांनी 25 लाखांचे अनुदान मिळवले व व्यवसाय वाढीस लावला. या अनुदानातून त्यांनी शेवग्यापासून बनवलेले तेल आणि कॅप्सूल भरण्यासाठीचे आवश्यक यंत्रसामग्री विकत घेतली.
सगळ्या प्रयत्नांच्या माध्यमातून कामिनी सिंग यांचा व्यवसाय आज खूप मोठा झाला आहे व ते स्वतःच नाही तर त्यांच्यासोबत इतर 50 ते 100 शेतकरी देखील या क्षेत्रात काम करत असून आज त्यांच्या संस्थेची वार्षिक कमाई एक कोटी 75 लाखाच्या आसपास आहे.